Home /News /maharashtra /

Petrol diesel Price : केंद्राच्या घोषणेनंतर राज्य सरकारकडूनही पेट्रोल, डिझेलवरील VAT मध्ये कपात, काय होईल परिणाम?

Petrol diesel Price : केंद्राच्या घोषणेनंतर राज्य सरकारकडूनही पेट्रोल, डिझेलवरील VAT मध्ये कपात, काय होईल परिणाम?

राज्य शासनाने आज 22 मे पासून पेट्रोल आणि डिझेलवरील (petrol diesel rate down) करात ( VAT) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात केली आहे.

  मुंबई, 22 मे : केंद्र शासनाने काल पेट्रोल आणि डिझेलचे (petrol and diesel rate) अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आज 22 मे पासून पेट्रोल आणि डिझेलवरील (petrol diesel rate down) करात ( VAT) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वर्षाला सुमारे 2500 कोटींचा राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे.

  VAT कमी केल्याने पेट्रोलसाठी 80 कोटी रुपये महिन्याला आणि 125 कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पन्न कमी होणार आहे. 16 जून 2020 ते 4 नोव्हेंबर 2021 या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 7 रुपये 69 पैसे आणि 15 रुपये 14 पैसे प्रती लिटर कर आकारत होते. मार्च आणि मे 2020 मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे 13 आणि 16 रुपये अशी वाढ केली होती.

  हे ही वाचा : sugarcane farmer : शेतकरी चिंतेत! राज्यात अद्यापही 17.5 लाख ऊस शिल्लक, अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर

  मोदी सरकारनंतर महाविकास आघाडी सरकारनेही पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी राज्यात पेट्रोल 2 रुपये 8 पैशांनी तर डिझेल 1 रुपये 44 पैशांनी स्वस्त होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महागाईने हैराण झालेल्या जनतेला मोदी सरकारने काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी "आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करत असल्याची घोषणा केली. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी (Petrol Diesel Price) कमी होणार आहे. त्यानंतर राज्यानेही आज पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम केंद्रसोबत राज्याच्या तिजोरीवरही पडणार आहे.

  पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज अपडेट होतात

  आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज अपडेट केल्या जातात. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती अपडेट करतात.

  पेट्रोल आणि डिझेलची किंमत घरबसल्या जाणून घेऊ शकता

  तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (How to check diesel petrol price daily). इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol and Diesel price cut

  पुढील बातम्या