मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Rape Case: कुस्ती कोचचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, जीवे मारण्याचीही दिली धमकी

Rape Case: कुस्ती कोचचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, जीवे मारण्याचीही दिली धमकी

काकाचं भूत अंगात शिरल्याचं सांगत अल्पवयीन मुलीवर भोंदूबाबाचा बलात्कार, भिवंडीतील धक्कादायक घटना (प्रातिनिधिक फोटो)

काकाचं भूत अंगात शिरल्याचं सांगत अल्पवयीन मुलीवर भोंदूबाबाचा बलात्कार, भिवंडीतील धक्कादायक घटना (प्रातिनिधिक फोटो)

Rape case: पीडित मुलगी कुस्ती शिकण्यासाठी संबंधित कोचकडे गेली असता आरोपीने गैरफायदा घेवून तिच्यावर बलात्कार केला (Wrestling coach rapes minor girl) आहे.

जींद, 29 मार्च: मुंबईतील एका बॉक्सिंग कोचने (Boxing Coach) अल्पवयीन विद्यार्थीनीवर (Minor Girl) लैंगिक अत्याचार (Rape) केल्याची घटना ताजी असताना आता एका कुस्ती कोचने 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला आहे. पीडित मुलगी कुस्ती शिकण्यासाठी संबंधित कोचकडे  गेली असता आरोपीने गैरफायदा घेवून तिच्यावर बलात्कार केला (Wrestling coach rapes minor girl) आहे. नराधम कोच एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने घटनेची वाच्यता कुठेही केल्यास पीडितेला जीवे (Threat to kill) मारण्याची धमकीही दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी कुस्ती कोचला अटक (Wrestling coach arrest) केली असून पुढील तपास केला जात आहे.

14 वर्षीय पीडित मुलगी हरियाणाच्या जींद जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी आहे. ती सध्या इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत आहे. तर आरोपी युवक सोनूने गावातील सरकारी शाळेत कुस्तीचा आखाडा सुरू केला आहे. तो मुलांसोबतचं मुलींनाही कुस्तीचं प्रशिक्षण देतो. आरोपीची मुलगीही याठिकाणी कुस्तीचं प्रशिक्षण घेते. दरम्यान कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शाळांना सुट्ट्या आहेत, त्यामुळे पीडित विद्यार्थिनीही कुस्ती शिकण्यासाठी आरोपी सोनूकडे जात होती.

27 मार्च रोजी दुपारी 3 च्या सुमारास पीडित विद्यार्थिनी इतर मुलींच्या अगोदर कुस्ती शिकण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपी सोनू एकटाच कुस्तीच्या आखाड्याच्या ठिकाणी होता. यावेळी त्याने पीडितेला एकटी पाहून संधीचा फायदा उचलला. आरोपी कुस्ती कोचने पीडितेला आखाड्याच्या एका खोलीत नेलं आणि तिथे तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर घटनेची वाच्यता कुठेही केल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिली.

(वाचा- बॉक्सिंग कोचने अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला लैंगिक अत्याचार; मुंबईतील संतापजनक प्रकार)

याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पीडित मुलीची वैद्यकीय केल्यानंतर पोलिसांनी आरोपी कोचला अटक केली आहे. आरोपी कोचच्या विरुद्ध बलात्कार, जीवे मारण्याची धमकी आणि एससीएसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

First published:

Tags: Haryana, Rape news