नाशिक, 12 फेब्रुवारी : ड्रेनेज लाईनचं खोदकाम करताना 2 मजूर 25 फूट खड्ड्यात पडून अपघात झाल्याची घटना घडली आहे. 25 फूट खोल खड्ड्यात पडल्यानंतर मजूर ढिगाऱ्याखाली दबले गेले होते. दबल्या गेलेल्या मजूरांना प्रसंगावधान राखत, ढिगारा बाजूला काढून बाहेर काढण्यात आलं आहे. 25 फूट खड्ड्यात पडलेल्या या मजूरांना अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवदान दिलं आहे. नाशिकरोड परिसरात ही घटना घडली. जेसीपीच्या सहाय्याने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आलं.
नाशिक : ड्रेनेज लाईनचे खोदकाम करताना 2 मजूर 25 फूट खड्यात पडले, ढिगाऱ्याखाली दबल्या गेलेल्या मजूरांना प्रसंगावधान राखत, ढिगारा बाजूला काढून बाहेर काढण्यात आलं. pic.twitter.com/DiI79jfBt2
— News18Lokmat (@News18lokmat) February 12, 2021
(वाचा - विठुरायाचं दर्शनही झालं नाही…पंढरपूरमध्ये पोहोचण्यापूर्वी अपघात,4 जण जागीच ठार )
मजूरावर मातीचा संपूर्ण ढिगारा आल्याने मजूर ढिगाऱ्याखाली दबला गेला होता. अनेक लोकांच्या मदतीने, मातीचा ढिगारा बाजूला करत मजूराला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं आहे.