जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पोलिसांत तक्रार दिल्याचा घेतला विचित्र बदला; दोघांनी पीडितेच्या घरात घुसून केलं विकृत कृत्य

पोलिसांत तक्रार दिल्याचा घेतला विचित्र बदला; दोघांनी पीडितेच्या घरात घुसून केलं विकृत कृत्य

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Crime in Dhule: धुळे शहरातील नचबारी परिसरात एक विचित्र घटना समोर आली आहे. पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणातून दोन जणांनी एका महिलेसोबत विकृत कृत्य केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

धुळे, 13 नोव्हेंबर: धुळे शहरातील नचबारी परिसरात एक विचित्र घटना समोर आली आहे. पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणातून दोन जणांनी एका महिलेच्या घरात शिरून तिचा विनयभंग (molestation) केला आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी स्वयंपाकघरातील चालू गॅसवर उलथणी गरम करत पीडितेच्या हाताला चटके दिले आहेत. तसेच पतीसह मुलांना जीवे मारण्याची धमकीही (Threat to death) दिल्याचं पीडितेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. योगेश रामदास पिंजन आणि जयदीप सखाराम पिंजन असं गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावं आहेत. दोन्ही संशयित आरोपी धुळे तालुक्यातील सोनेवाडी येथील रहिवासी आहेत. संबंधित आरोपींनी पीडितेच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करत, तिच्यासोबत लज्जास्पद कृत्य केलं आहे. एका आरोपीनं पीडित महिलेचे दोन्ही हात घट्ट पकडले, तर अन्य एका आरोपीनं स्वयंपाक घरात सुरू असलेल्या गॅसजवळ पडलेली उलथणी गरम करून पीडितेला गरम चटके दिले आहेत. हेही वाचा- Pune: अंध पतीच्या डोळ्यात फेकली धूळ; 7 महिने संसार करत लाखोंचा घातला गंडा आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पीडितेच्या पतीला आणि मुलांना जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. संबंधित संतापजनक घटना घडल्यानंतर पीडितेनं चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दोन संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मारहाणीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास सुरू केला आहे. हेही वाचा- बीड हादरलं! अल्पवयीन मुलीवर 400 जणांकडून बलात्कार, पोलिसानंही केलं लैंगिक शोषण नेमकं प्रकरण काय आहे? काही दिवसांपूर्वी पीडित महिलेनं संबंधित आरोपींविरोधात धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पीडित महिलेनं तिच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची तक्रार दिली होती. याच रागातून सूड उगवण्यासाठी आरोपींनी हे कृत्य केलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात