Home /News /maharashtra /

18 कोटींना फसवणारा विशाल फटेला अखेर अटक, पोलिसांना आला शरण!

18 कोटींना फसवणारा विशाल फटेला अखेर अटक, पोलिसांना आला शरण!

 गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 18 कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 18 कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 18 कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

सोलापूर, 17 जानेवारी : शेअर मार्केटच्या माध्यमातून बार्शी शहरातील लोकांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडण्याला आरोप असलेला आरोपी विशाल फटे अखेर पोलिसांसमोर हजर झाला आहे. पोलिसांनी विशाल फटेला (vishal fate) अटक केली आहे. तर, गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 18 कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. (Vishal Fate arrested by solapur police) अलका शेअर्स सर्व्हिसेसचा (Alka Shares Services) संचालक विशाल फटेच्या कारनाम्याची राज्यभरात खळबळ उडाली आहे. विशाल फटे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी एकूण 50 जणांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत 18 कोटींना फसवणूक केल्याचे समोर आले आहे. 10 लाख गुंडवणुकीवर कोट्यवधीचे आमिष विशाल फटेनं दिलं होतं. अखेर आज आरोपी स्वतः सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात झाला हजर झाला आहे. पोलिसांनी विशाल फटेला अटक केली आहे. (BREAKING : ST कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर, कामगार कोर्टाचा दणका) याआधीच गुंतवणूकदारांच्या तक्रारीवरून आरोपी विशाल अंबादास फटे, राधिका विशाल फटे, रामदास गणपती फटे, वैभव अंबादास फटे आणि अलका अंबादास फटे यांच्या विरोधात भा.द. वि.कलम 420, 409, 417, 34 आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळीच आरोपी विशाल फटे याने आज आपली बाजू स्पष्ट केली होती. युट्यूबद्वारे आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाय. स्वतःच्या युट्युब चॅनेलवरून घडलेल्या गोष्टींबाबत स्पष्टकरण देण्याचा प्रयत्न आरोपी विशाल फटे याने केला. 'माझा लोकांना फसवण्याचा कोणताही हेतू नव्हता, काही चुका झाल्या त्यामुळे पैसे माझे अडकले आहेत. मला माझ्या चुका मान्य असून मी शिक्षा भोगायालाही तयार आहे. त्याचबरोबर आज मी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये हजर होणार असल्याचेही त्याने आपल्या व्हिडीओत स्पष्ट केले होते. कालच त्याचा वडील आणि भावाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज विशाल फटे याने व्हिडीओ पोस्ट करुन आपली बाजू स्पष्ट केली. (सर्दी, व्हायरल तापाची लक्षणं, तरी कोरोना टेस्ट करावी का? काय सांगतात तज्ज्ञ पाहा) आरोपी विशाल फटेविरोधात 18 कोटींपेक्षा जास्तीची फसवणूक केल्याबद्दल तक्रारी दाखल आहेत. त्याला शोधण्यासाठी बार्शी पोलिसांचे 8 पथकं रवाना झाली होती. दरम्यान, आता खुद्द फटेच पोलिसांसमोर हजर झाला आहे. त्यामुळे याप्रकरणात आणखी किती लोकांना फसवलं असेल याची माहिती समोर येईल.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या