मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नवनीत राणांच्या जिल्ह्यात धक्कादायक वास्तव, वर्षभरात 'इतकी' बालकं दगावली

नवनीत राणांच्या जिल्ह्यात धक्कादायक वास्तव, वर्षभरात 'इतकी' बालकं दगावली

फाईल फोटो

फाईल फोटो

अमरावती जिल्ह्यातील भयानक परिस्थिती आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Amravati, India

अमरावती, 31 मार्च : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात वर्षेभरात तब्बल 176 बालकांचा विविध कारणांनी मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. वर्षभरात या ठिकाणी 1876 बालकांना दाखल करण्यात आले होते. यात 1356 बालकांना वाचवण्यात यश आलं आहे.

मात्र, या ठिकाणी एनआयसीयु विभागात 26 सप्टेंबरला आग लागली होती. त्यात व्हेंटिलेटरचा स्फोट झाला होता. त्यामध्ये दोन व्हेंटिलेटर बंद पडली तर 1 व्हेंटिलेटर सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, या 176 मृत्युमुखी पडलेल्या बालकांचे आजार वेगवेगळे असले तरी त्यांना व्हेंटिलेटर ची आवश्यकता पडली नसेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आमच्याकडे पाच सी प्याप मशीन असल्याचा डॉक्टरानी सांगितले. मात्र, असे असले तरी रुग्णालयात एकच व्हेंटिलेटर असून आता डॉक्टरांनी पुन्हा चार व्हेंटिलेटरची मागणी केली आहे, अशी माहिती जिल्हास्तरीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनोद पवार यांनी दिली.

काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास मज्जाव; संभाजीराजे छत्रपतींच्या पत्नीची भावनिक पोस्ट, म्हणाल्या अजूनही...

तर याबाबत बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे अमरावती महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी थेट सरकारवरच प्रश्न उपस्थित केला. 176 बालकांचा मृत्यू कसा होऊ शकतो, यात आरोग्य यंत्रणेचे अपयश नाही का, असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच याबाबत त्यांनी निषेध करत आंदोलनाचाही इशारा दिला.

First published:
top videos

    Tags: Amravati, Health, Navneet Rana