लखनऊ 01 डिसेंबर : गाजियाबादच्या ठाणा कवीनगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. यात एक विवाहित महिला आपल्या प्रियकरासोबत नग्नावस्थेत व्हिडिओ कॉलवर (Naked Woman on Video Call with Lover) बोलत असल्याचं सिक्रेट कॅमेऱ्यात (Secret Camera) कैद झालं. या प्रकरणी पीडित युवकाने आपली पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात (Extramarital Affair of Woman) पोलिसांत तक्रार दाखल करत कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्यामुळेच पतीने घरात सिक्रेट कॅमेरा लावला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणा कवीनगर क्षेत्रात एक युवक आपली पत्नी, एक मुलगा आणि दोन मुलींसोबत राहात होता. युवकाला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर पहिल्यापासूनच संशय होता. अखेर सत्य जाणून घेण्यासाठी त्याने आपल्याच घरात सिक्रेट कॅमेरा बसवून घेतला. ऑक्टोबरमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये त्याला जे काही दिसलं ते पाहून धक्काच बसला. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याची पत्नी आपल्या प्रियकरासोबत नग्नावस्थेत व्हिडिओ कॉलवर बोलताना दिसली. यानंतर युवकाने आपली पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी लगेचच पोलिसांत धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित युवकाने याबद्दल आपल्या मोठ्या मुलीकडे कसून चौकशी केली असता तिने आपल्या आईचा पूर्ण कारनामा वडिलांना सांगितला. असा आरोप आहे की ऑक्टोबर महिन्यात महिलेनं आपल्या प्रियकरासमोर आपल्या 13 वर्षीय मुलीलाही नग्नावस्थेत उभा केलं होतं. महिलेनं आपल्या मुलांना धमकी दिली होती की याबद्दल वडिलांना किंवा इतर कोणाला काही सांगितल्यास जीवे मारेल. यामुळे मोठ्या मुलीनंही याबाबत काहीही सांगितलं नाही.
एसपी सिटी निपुण अग्रवाल यांनी सांगितलं की कवीनगर ठाणा क्षेत्रांतर्गत राहणाऱ्या एका युवकाद्वारे कवीनगर ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. यात असं म्हटलं आहे की नवऱ्याच्या अनुपस्थितीत त्याच्या घरी कोणीतरी कॅब ड्रायव्हर यायचा. तो सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैदही झाला होता. मात्र जेव्हा त्याच्या पत्नीला याबाबत माहिती झालं तेव्हा तिनं सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले. मात्र याबद्दलची माहिती आसपासच्या लोकांकडूनही पतीला मिळत राहिली. यानंतर युवकाने घराच्या आतमध्येच सिक्रेट कॅमेरा लावला. यात त्याची पत्नी आणि तेरा वर्षाची मुलगी नग्नावस्थेत कॅब ड्रायव्हरसोबत व्हिडिओ कॉलवर बोलताना दिसली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.