जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Mumbai : 14 लाख रुपये खर्च केलेली मुतारी उद्घटनानंतर बंद; कुर्ल्यातील धक्कादायक प्रकार, पाहा VIDEO

Mumbai : 14 लाख रुपये खर्च केलेली मुतारी उद्घटनानंतर बंद; कुर्ल्यातील धक्कादायक प्रकार, पाहा VIDEO

Mumbai : 14 लाख रुपये खर्च केलेली मुतारी उद्घटनानंतर बंद; कुर्ल्यातील धक्कादायक प्रकार, पाहा VIDEO

बृहन्मुंबई महानगरपालिकेने ( mumbai municipal corporation ) अनेक ठिकाणी मुताऱ्या आणि सार्वजनिक शौचालये ( Public Toilet ) मुंबईकरांना उपलब्ध करून दिली आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 10 ऑगस्ट :  बृहन्मुंबई महानगरपालिकेने ( mumbai municipal corporation ) अनेक ठिकाणी मुताऱ्या आणि सार्वजनिक शौचालये ( Public Toilet ) मुंबईकरांना उपलब्ध करून दिली आहेत. मुताऱ्या आणि या शौचालयांची स्वच्छता अधिक चांगल्या पद्धतीने राखण्याची जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिकेची आहे. मुंबईतील कुर्ला मधील काजूपाडा ( Kajupada ) विभागात एक सार्वजनिक मुतारी तब्बल 14 लाख रुपये खर्च करून बांधण्यात आली आहे. सध्याचे आमदार दिलीप लांडे यांच्या विभागात ही बांधण्यात आली आहे. मात्र, उद्घाटन झाल्यानंतर ही मुतारी अजुनही सामन्यांसाठी खुली करण्यात आलेली नाही. 10 बाय 6 च्या मुतारीसाठी अंदाजे 3 लाख रुपये खर्च होणे अपेक्षित होते. मात्र 14 लाख रुपये कसे गेले हा प्रश्न स्थानिक लोक विचारत आहेत. 14 लाख रुपये इतका खर्च कशासाठी? मुतारी बांधण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून निधी मंजूर केला गेला जातो. त्यावेळी जुनी मुतारी तोडून त्या जागी नवी मुतारी बंधने आवश्यक असते. मात्र, असे न करता कुर्ला मधील काजूपाडा येथे जुन्या मुतारीलाच दुरुस्त केले गेले आहे. जुन्या मुतारीवर प्लास्टर करून टाईल्स फरश्या लावल्या गेल्या आहेत. या कामासाठी साधारणतः 3 लाख रुपये खर्च येणे आवश्यक होते. मात्र महिती अधिकार कायद्या अंतर्गत आम्हाला अशी माहिती मिळाली की याला 14 लाख रुपये इतका खर्च या मुतारी साठी लागला आहे. एवढा खर्च कशासाठी आला असा प्रश्न स्थानिक रहिवाशी व सामाजिक कार्यकर्ते अॅड. कैलास आगवणे News18 Local शी बोलताना उपस्थित केला आहे.

    हेही वाचा :  Pune: यंदा राखी बांधा आणि नंतर खा! भावासाठी घेऊन या Chocolate Rakhi, Video

    स्थानिक नागरिक रियाझ मुल्ला News18 Local शी बोलताना म्हणाले की, जनेतचा माल आणी माझी कमाल अशी स्थिती सध्याची आहे.  बृहन्मुंबई महानगरपालिकेने 14 लाख रुपये इतका खर्च केला. मात्र मुतारी सामन्यांसाठी खुलीच होऊ शकली नाही. गेले काही महिने आम्ही ही मुतारी सर्वांसाठी खुली व्हावी यासाठी पाठपुरावा करत आहोत. कोणत्याही प्रकारची दखल याबाबतीत घेतली गेली नाही आहे. असं म्हणतात जगात भारी लाखाची मुतारी या म्हणीप्रमाणे हा कारभार केला जात आहे. संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. दरम्यान, स्थानिकांच्या आरोपांवर आम्ही आमदार दिलीप लांडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे याप्रकरणी त्यांची बाजू समजू शकली नाही. या प्रकरणी पालिका अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता मंगेश पालवे म्हणाले की, महानगरपालिकेने खूप चांगल्या प्रकारे काम केलेले आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात