22 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची आणि शिवसेना-भाजप युतीमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असतानाच जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर आघाडीमधील बिघाडी कमी झाल्याने नाशिक, अमरावती वगळता बहुतांशी जिल्हा परिषदांवर आघाडीचाच झेंडा दिमाखाने फडकला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जागा वाढवून हव्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी अखेर आपली चूक सुधारत अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप ऐवजी काँग्रेसला साथ दिली. राष्ट्रवादीने रविवारीही भाजपाला साथ दिली असती तर काँग्रेसच्या नाराजीचा त्यांना सामना करावा लागला असता आणि जागा वाटपावरही परिणाम होण्याची शक्यता होती.
नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे विजयश्री चुंबळे यांची बिनविरोध निवड झाली. पण उपाध्यक्षपदावरुन आघाडीत बिघाडी झाली. भुजबळ आणि कोकाटे यांच्या वादामुळे उपाध्यक्षपद गेल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय तर काँग्रेसमध्ये एकवाक्यता नसल्याने उपाध्यक्षपद गमावल्याचे भुजबळ यांचे म्हणणे आहे.
अमरावतीत जिल्हा परिषदेत काँग्रेसनं पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे बंडखोर नेते संजय खोडके यांच्या गटाशी हातमिळवणी केली. त्यामुळे अमरावती जिल्हा परिषदेत काँग्रेसचा अध्यक्ष तर खोडके गटाचा उपाध्यक्ष निवडून आले. अमरावतीमध्ये सतीश उईके यांची अध्यक्षपदी तर सतीश हाडोळे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.
वर्धा जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून वाद टोकाला जात चक्क हाणामारी झाली. भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते सभागृहातच एकमेकांवर धावून गेले. त्यामुळे काही काळ सभागृह आणि सभागृहाबाहेर कमालीचा तणाव निर्माण झाला होता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणजीत कांबळे गटाला जिल्हा परिषदेत पराभव दिसत असल्यानं संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी राडा केल्याची चर्चा आहे.
जिल्हा परिषदांचे निकाल
वर्धा
परभणी
बुलडाणा
नांदेड
बीड
लातूर
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Election, Marathwada, Zilla Parishad