मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

झोक्याचा फास लागल्याने 11 वर्षीय मुलासोबत घडलं भयानक, जळगावातील धक्कादायक घटना

झोक्याचा फास लागल्याने 11 वर्षीय मुलासोबत घडलं भयानक, जळगावातील धक्कादायक घटना

मृत अंंशू माळी.

मृत अंंशू माळी.

अंशू किरण माळी असे मृत मुलाचे नाव आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India
  • Published by:  Khushalkant Dusane

जळगाव, 7 डिसेंबर : जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. झोक्याचा फास लागल्याने मुलाचा गुदमरून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. ही घटना आज (बुधवारी) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.

काय आहे संपूर्ण घटना -

जळगावातील जुने जळगाव आतील 11 वर्षीय मुलाचा झोक्याचा फास लागून गुदमरून मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीला आली. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अंशू किरण माळी असे मृत मुलाचे नाव आहे.

अंशू किरण माळी हा मुलगा जुने जळगाव येथील बदाम गल्लीत आई, लहान भाऊ व वडील यांच्यासह वास्तव्याला होता. त्याचे वडील नाशिक येथे कंपनीत नोकरीला आहे. तर आई मोलमजूरी करून आपला उदरनिर्वाह करते. बुधवार 7 डिसेंबरला आई व वडील घरी नसतांना घराच्या वरच्या मजल्यावर अंशू हा लहान भावासोबत झोक्यावर खेळत होता. खेळताखेळता अचानक अंशूच्या गळ्यात झोक्याच्या दोरीचा फास लागल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाला.

हेही वाचा - प्रवाशांसह अर्धवट झुलत राहिली बस, अमरावतीमधील अपघाताचे धक्कादायक PHOTOS

ही घटना सायंकाही साडेसहा वाजताच्या सुमारास काका घरी आले तेव्हा लक्षात आला. त्यांनी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी अंशूला मृत घोषित केले. यावेळी जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. या घटनेबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

First published:

Tags: Death, Jalgaon, Small child