अमरावती, 7 डिसेंबर : राज्यात अपघाताच्या घटनाही सातत्याने समोर येत असतात. पुण्यातील नवले पुलावर झालेल्या अपघाताची घटना ताजी असतानाच आता अमरावती जिल्ह्यातही विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. अमरावती-नागपूर महामार्गावर नांदगाव पेठ येथे एसटी बस बसला विचित्र अपघात झाला. अमरावती-नागपूर महामार्गावर नांदगाव पेठ येथे एसटी बस बसला विचित्र अपघात झाला. या अपघातात नांदगाव पेठच्या उड्डाणपूलावरून बस खाली कोसळताना थोडक्यात बचावली. अपघातानंतर बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात अनेक प्रवाशांचे थोडक्यात जीव वाचले. ही एसटी बस औरंगाबादवरून नागपूरला जात होती. तर नागपूरमधील गणेशपेठ डेपोच्या बसला अमरावतीच्या नांदगाव पेठमध्ये अपघात झाला.