मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धुळ्यातील डॉक्टरची कमाल, एक किलोचा मुतखडा काढला बाहेर, शस्त्रक्रियेची आशिया बुकनेही घेतली दखल

धुळ्यातील डॉक्टरची कमाल, एक किलोचा मुतखडा काढला बाहेर, शस्त्रक्रियेची आशिया बुकनेही घेतली दखल

ही आतापर्यंतची मुतखड्यावरील सर्वात मोठे शस्त्रक्रिया आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. नंदुरबार येथील 50 वर्षांच्या रमण चौरे यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

  • Published by:  News18 Desk
धुळे, 29 जुलै : धुळे जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉ. आशिष पाटील यांनी भारतातली पहिली मोठी शस्त्रक्रिया केली आहे. त्यांनी केलेल्या या शस्त्रक्रियेची इंडिया बुक व आशिया बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली आहे. त्यांनी तब्बल एक किलोचा मुतखडा काढून शेतकऱ्याला जीवनदान दिले आहे. याबाबत पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. काय आहे संपूर्ण बातमी - डॉ. आशिष पाटील हे धुळ्यातील प्रसिद्ध डॉक्टर आहेत. त्यांनी केलेल्या एका शस्त्रक्रियेमुळे एका शेतकऱ्याला जीवनदान मिळाले आहे. त्यांनी शेतकऱ्याच्या पोटातून तब्बल एक किलोचा मुतखडा काढला. ही आतापर्यंतची मुतखड्यावरील सर्वात मोठे शस्त्रक्रिया आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. नंदुरबार येथील 50 वर्षांच्या रमण चौरे यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. रमण चौरे यांना मुतखड्याचा त्रास होता. त्यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन यावर उपचार केला. मात्र, त्याचे निदान झाले नाही. अखेर त्यांनी धुळे येथील तेजनक्ष हॉस्पिटल गाठले. याठिकाणी त्यांच्यावर डॉ. आशिष पाटील 1 तास शस्त्रक्रिया केली. यानंतर त्यांच्या कंबरेतून तब्बल 1 किलोचा मुतखडा बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. त्यांनी केलेल्या या शस्त्रक्रियेची नोंद इंडिया बुक व आशिया बुक ऑफमध्ये रेकॉर्डमध्येही झाली आहे. हा रेकॉर्ड मुतखड्याच्या पिशवीमधून खडा काढण्याचा झाला आहे. याअगोदरचा विश्वविक्रम 9 सेमीचा होता, अशी माहिती त्यांनी दिली. हा खडा एवढा मोठा होता त्यानंतर 20-25 मिनिटे त्याला बाहेर काढायला लागले, अशी माहितीही त्यांनी दिली. तर रुग्णाची परिस्थिती उत्तम आहे आणि लवकरच तो बरा होऊन घरी जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हेही वाचा - दिवसा वारंवार डुलक्या काढणाऱ्यांनी इकडं लक्ष द्या; या गंभीर आजारांचे असू शकते लक्षण डॉ. आशिष पाटील यांनी भारतातली पहिली मोठी शस्त्रक्रिया केली आहे. त्यांनी केलेल्या या शस्त्रक्रियेची इंडिया बुक व आशिया बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली आहे. लवकरच त्याची नोंद केली जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
First published:

Tags: Dhule, Operation

पुढील बातम्या