मुंबई, 10 मार्च : अनेक जण शेतीला जोडधंदा म्हणून कुकुटपालन करतात. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी हे प्रमाण पाहायला मिळते. दरम्यान, शासकीय स्तरावरही कुकूटपालनासाठी सरकारकडून चांगले अनुदान देण्यात येते. कोंबड्यांच्या अनेक जातींपैकी एक असलेल्या कडकनाथ कोंबडीला प्रचंड मागणी असते. मात्र, आज आम्ही तुम्हाला एका अशा एका कोंबडीच्या जातीबाबत सांगणार आहोत, ज्या कोंबडीच्या एका अंड्याची किंमत 100 रुपये आहे. हॅलो कृषी डॉट कॉमने याबाबतचे उत्तर दिले आहे. कुकूटपालनातून मांस, अंडे यांची विक्री करून पैसे कमावता येतात. मात्र, यासोबतच कोंबड्यांच्या शिटांपासून शेतीसाठी खतही मिळते. पण कुकुटपालन करताना कोणत्या जातींची निवड करावी, हे ठरवणे खूप गरजेचे आहे. अंडे देणाऱ्या कोंबड्या, खास मांसासाठी असलेल्या जातींच्या कोंबड्या कि देशी कोंबड्या, याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. यात सध्या असील जातीच्या कोंबड्यांची खूप चर्चा होत आहे. या कोंबड्यांची उपलब्धता बाजारात कमी आहे. त्यामुळे यांना अतिशय चांगला दर मिळतो. शिवाय अतिशय पौष्टिक गुणधर्म असल्याने याची सतत मागणी राहते. Maha budget 2023 : शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! 1 रुपयांत मिळणार पीकविमा, बजेटमध्ये मोठी घोषणा असीलचा खरा अर्थ खरे किंवा शुध्द असा आहे. असील ही जात तिच्या लढवय्येपणा, उच्च कार्यक्षमता, दिमाखदार रुप आणि संघर्ष कौशल्यांसाठी परिचित आहे. या महत्वाच्या जातीचे मूळ स्थान आंध्रप्रदेश असावे, असे सांगितले जाते. या जातीतील चांगल्या प्रकारच्या कोंबड्यांची झुंज लावली जाते. तसेच देशभरात लोक त्यांच्या झुंजी आयोजित करीत असतात. असील ही जात मोठ्या हाडा-पेराची आणि राजेशाही दिसणारी आणि दिमाखदार रुप असलेली आहे. यातील नर कोंबड्यांचे प्रमाणित वजन 3 ते 4 किलो तर मादी कोंबड्यांचे वजन 2 ते 3 किलो असते. या कोंबडीच्या एका अंड्याची किंमत 100 रुपये आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.