मुंबई : विधिमंडळात आज महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प मांडला जात आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हा अर्थसंकल्प टॅबच्या मदतीने विधिमंडळात मांडत आहेत. अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात अवकाळी पाऊस किंवा बऱ्याचदा हवामानातील बदलामुळे अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकाचं नुकसान होतं. हातातोंडाशी आलेला घास जातो. अशा शेतकऱ्यांना पिकविमा लवकर मिळावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. याशिवाय आता राज्य सरकारने 1 रुपयात पीकविमा आणला आहे. शेतकऱ्यांवरील अधिकचा भार टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकर्यांकडून घेतले जात होते. आता शेतकर्यांवर कोणताच भार नाही. राज्य सरकार विम्याचे हप्ते भरणार अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. शेतकर्यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा देणार असून त्यासाठी आता 3312 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार असल्याचं विधिमंडळात सांगितलं. फडणवीसांकडून महत्त्वाच्या घोषणा महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी महाकृषिविकास अभियान - राज्यातील शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषिविकास अभियान राबविणार - पीक, फळपीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत - तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना - एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार - 5 वर्षांत 3000 कोटी रुपये उपलब्ध करून देणार
‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा आता व्यापक विस्तार - मागेल त्याला शेततळे योजनेचा आता व्यापक विस्तार - आता मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण - मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर - या योजनेवर 1000 कोटी रुपये खर्च करणार गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून, लाभही 2 लाखांपर्यंत - गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्यांकडून

)







