मराठी बातम्या /बातम्या /love-story /

लग्नासाठी महिलेनं प्रियकराच्या पत्नीलाच मागितली परवानगी; अन् पुढे घडलं असं काही..

लग्नासाठी महिलेनं प्रियकराच्या पत्नीलाच मागितली परवानगी; अन् पुढे घडलं असं काही..

ही घटना आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील आहे.

ही घटना आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील आहे.

ही घटना आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Tirupati, India
  • Published by:  News18 Desk

तिरुपति, 25 सप्टेंबर : प्रेम आणि लग्नाच्या अनेक गोष्टी, किस्से तुम्ही ऐकले असतील. मात्र, एक वेगळीच घटना समोर आली आहे. ही घटना वाचून तुम्हाला हे प्रकरण थोडं फिल्मी वाटलं. पण हे सत्य आहे. एखाद्या चित्रपटाप्रमाणेच एका पत्नीने आपल्या पतीचे लग्न त्याच्या आधीच्या प्रेयसीसोबत लावून दिले आहे. तसेच, विवाह सोहळ्यादरम्यान पत्नीही उपस्थित होती. इतकचे नाही तर आता तिन्ही जण एकाच घरात एकत्र राहणार आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

ही घटना आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील आहे. डक्कली येथील आंबेडकर नगर येथील रहिवासी असलेला कल्याण हा युट्यूब आणि शेअर चॅटवर खूप लोकप्रिय आहे. काही वर्षांपूर्वी कल्याणची भेट विमलासोबत झाली होती. यानंतर हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि नंतर लग्न झाले. तसेच कल्याण आणि विमला मिळून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ बनवू लागले.

मात्र, काही वर्षांनंतर या दोघांच्या नात्यामध्ये तडा जाऊ लागला. कारण या प्रकरणात विशाखापट्टणममधील नित्याश्री नावाच्या मुलीची एंट्री होते. तीसुद्धा सोशल मीडियावर व्हिडिओही बनवत असे. कल्याण आणि नित्यामध्येही प्रेमसंबंध होते. मात्र, काही वर्षांपूर्वीच त्यांचे नाते तुटले. यानंतर कल्याणने विमलासोबत लग्न केले. मात्र, जेव्हा नित्याला या लग्नाची माहिती मिळाली तेव्हा ती त्याच्या घरी पोहोचली.

जेव्हा नित्याश्रीला माहित झाले की कल्याण विवाहित आहे, तेव्हा तिने त्याच्या पत्नी विमलला हात जोडून विनंती केली की, तिने कल्याणला तिच्यासोबत लग्न करण्याची परवानगी द्यावी. तसेच तिने आणि कल्याणने असा प्रस्तावही मांडला की, ते तिघेही एकाच छताखाली राहतील. बराच वेळ विचार केल्यानंतर विमलाने या प्रस्तावाला होकार देत सहमती दर्शवली.

हेही वाचा - देहव्यापार करणारी प्रेयसी दारू पिऊन घरी आली, प्रियकराने आवळला गळा, मृतदेह घेऊन निघाला कर्नाटकला पण...

इतकेच नव्हे तर नित्यश्री आणि पती कल्याण या दोघांचा विवाह सर्व पारंपरिक रितीरिवाजांनी मंदिरात पार पडला. यानंतर तिघांनीही फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका पत्नीने आपल्या पतीचे त्याच्या प्रेयसीसोबत लावलेल्या लग्नाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. आता या तिघांनी एकाच ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतला आहे.

First published:

Tags: Andhra pradesh, Marriage