जाहिरात
मराठी बातम्या / लव स्टोरी / Relationship: जर मनात भरलाच तर त्याच्याविषयी मुली करतात असा विचार; पाहतात मुलाच्या या गोष्टी

Relationship: जर मनात भरलाच तर त्याच्याविषयी मुली करतात असा विचार; पाहतात मुलाच्या या गोष्टी

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

मुली फक्त मुलांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होत नाहीत, तर त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीनेही प्रभावित होतात. जाणून घेऊया मुलाकडे बघून आकर्षित झाल्यानंतर मुली त्यांच्या मनात काय विचार (Love Relationship) करतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 ऑगस्ट : दुसऱ्या लिंगाकडे आकर्षित होणे हा मानवी स्वभाव आहे. ज्याप्रमाणे मुले मुलींकडे आकर्षित होतात, त्याचप्रमाणे मुलीही मुलांकडे आकर्षित होतात. मात्र, मुली केवळ मुलांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होत नाहीत तर त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीनेही प्रभावित होतात. जाणून घेऊया मुलाकडे बघून आकर्षित झाल्यानंतर मुली त्यांच्या मनात काय विचार (Love Relationship) करतात. असं म्हणतात की, जो आपल्याला आवडतो त्याला फक्त पाहणंही पुरेसं असतं. विशेषत: मुलींनाही आपल्या प्रेमाला दुरूनच बघायला जास्त आवडतं. मुलींच्या बाबतीत असं असतं की, त्यांना जी व्यक्ती आवडते त्याला पुन्हा पुन्हा पहायचे असते. जेव्हा तो मुलगा तिच्या समोर येतो तेव्हा, ती त्याला पाहण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही. त्यावेळी तिची नजर फक्त त्या मुलालाच शोधत असते. आवडत्या मुलाला पाहून त्यांच्या मनात पहिला प्रश्न येतो तो म्हणजे, मुलगा कोणसोबत रिलेशनशीपमध्ये नसेल ना. किंवा त्याचे लग्न झाले नाही ना. समोरची व्यक्ती रिलेशनशिपमध्ये आहे की, नाही याची त्या विशेष काळजी घेतात. त्याची शहानिशा करूनच प्रकरण पुढे नेण्यात त्यांना रस असतो. हे वाचा -  डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर खात्री करून मुलगा आवडला असेल तर तिला त्याच्याशी बोलायचे असते. मात्र, अर्थात तिला लगेचच आपलं प्रेम उघड करायचं नसतं. बहुतेकदा असे मानले जाते की, मुलींना मुलांशी बोलणे आवडत नाही, परंतु मुलींना जो कोणी मुलगा आवडतो त्याच्याशी ती फक्त बोलतच नाही तर त्याला चांगला मित्र बनवते. आणि तिच्या मनातलं त्यांच्याशी बोलण्यात तिला फार बरं वाटतं. हे वाचा -  ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा मुलीला जर मुलगा आवडला असेल तर ती त्याच्या कपड्यांपासून ते त्याच्या बोलण्याच्या पद्धतीपर्यंत सर्व गोष्टी नोटीस करते. त्या मुलाचा सेन्स ऑफ ह्युमर काय आहे, याचाही त्या विचार करत असतात. तो विनोद कसा करतो किंवा कोणत्या मुद्द्यांवर तो काय विचार करतो? याकडेही त्या बारकाईने पाहत असतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात