जाहिरात
मराठी बातम्या / लव स्टोरी / जो कुणी विशाल असेल त्याला हे सांगा, कुसुमच्या लग्नाचा निरोप व्हायरल

जो कुणी विशाल असेल त्याला हे सांगा, कुसुमच्या लग्नाचा निरोप व्हायरल

काही वर्षांपूर्वी 10 रुपयांच्या नोटेवर 'सोनम गुप्ता बेवफा है' असा लिहिलेला मेसेज व्हायरल झाला होता.

काही वर्षांपूर्वी 10 रुपयांच्या नोटेवर 'सोनम गुप्ता बेवफा है' असा लिहिलेला मेसेज व्हायरल झाला होता.

काही वर्षांपूर्वी 10 रुपयांच्या नोटेवर ‘सोनम गुप्ता बेवफा है’ असा लिहिलेला मेसेज व्हायरल झाला होता.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 11 फेब्रुवारी :  आजकाल सोशल मीडियावर काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. विचित्र, मजेदार व्हिडीओ, मेसेज आणि पत्रं दररोज इंटरनेटवर व्हायरल होतात. काही वर्षांपूर्वी 10 रुपयांच्या चलनी नोटेवर लिहिलेला ‘सोनम गुप्ता बेवफा है’ असा मेसेज व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा 10 रुपयांच्या नोटेवर प्रेयसीने प्रियकरासाठी लिहिलेला मेसेज व्हायरल होत आहे. आता लोक वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा मेसेज शेअर करत आहेत. दैनंदिन व्यवहारांसाठी वापरल्या जाणाऱ्या नोटा मेसेजसाठीदेखील कामी येतात. लोक या नोट्सचा वापर आपल्या प्रिय व्यक्तीला मेसेज देण्यासाठी करत आहेत. कारण या नोटांवर लोकांनी आपल्या प्रिय व्यक्तींसाठी लिहिलेले मेसेज अनेकदा व्हायरल झाले आहेत आणि पुन्हा एकदा तेच घडलं आहे. आता कुसुम नावाच्या तथाकथित मुलीने 10 रुपयांच्या नोटेद्वारे तिचा मेसेज तिच्या प्रियकरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी तिने थेट 10 रुपयांच्या नोटेवर तिचा मेसेज लिहिला आहे. (बापरे! ‘पतली कमरिया’वर ठुमके तरुणीला पडले भारी; काय घडलं पाहा Shocking Video) आता कुसुमने नोटवर प्रियकरासाठी लिहिलेलं लव्ह लेटर व्हायरल झालं आहे. हे लेटर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातं आहे. कुसुमने 10 रुपयांच्या नोटेवर ‘विशाल, माझं लग्न 26 एप्रिलला आहे. मला इथून पळवून घेऊन जा. मी तुझ्यावर खूप प्रेम करते, तुझीच कुसुम’ असं लिहिलं आहे. आता ही कुसुम खरंच मुलगी आहे का माहीत नाही पण कुणीतरी हे लिहिलंय. तिचा प्रियकर विशाल पण कोण आहे हेही कुणाला माहीत नाही. आता कुसुमने लिहिलेला हा मेसेज तिचा प्रियकर विशालपर्यंत पोहोचला की नाही ते माहीत नाही, पण तो सोशल मीडियावर नक्कीच व्हायरल झाला आहे.

    News18

    यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. यासोबतच युजर्स फनी मीम्सही शेअर करत आहेत. काही जणांनी सीआयडी मालिकेतील ए. सी.पी. प्रद्युम्न यांना बोलवा, असं म्हटलं आहे. तर, एका युजरने ही नोट पोस्ट करत लिहिलं की, ‘ट्विटर तुझी ताकद दाखव, कारण कुसुमचा हा मेसेज 26 एप्रिलपूर्वी विशालला पोहोचवायचा आहे.

    News18

    आपल्याला दोन प्रेमींना एकत्र आणावं लागेल. प्लीज तुमच्या ओळखीच्या विशाल नावाच्या सर्व मुलांना टॅग करा,’ त्यानंतर काही जण खरोखरच सर्व विशाल नावाच्या मुलांना टॅग करत आहेत. ( Video : फोटोची भारी हौस; फोटो काढायला गेली अन्.., महिलेसोबत जे घडलं ते पाहून हासू आवरणार नाही ) या आधीही नोटांवर लिहिलेले मेसेज व्हायरल झाले आहेत. काही वर्षांपूर्वी 10 रुपयांच्या नोटेवर ‘सोनम गुप्ता बेवफा है’ असा लिहिलेला मेसेज व्हायरल झाला होता. काही वर्षांपूर्वी व्हॅलेंटाईन्स डेला 20 रुपयांच्या नोटेवर ‘राशी बेवफा है’ लिहिलेली नोट व्हायरल झाली होती. यावरही लोकांनी जोरदार मीम्स बनवले होते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात