जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / तुमच्या घरात जागोजागी राहतो हा भयानक प्राणी; खरा चेहरा बघून तुम्हालाही फुटेल घाम

तुमच्या घरात जागोजागी राहतो हा भयानक प्राणी; खरा चेहरा बघून तुम्हालाही फुटेल घाम

तुमच्या घरात जागोजागी राहतो हा भयानक प्राणी; खरा चेहरा बघून तुम्हालाही फुटेल घाम

तुमच्या घरात जागोजागी राहतो हा भयानक प्राणी; खरा चेहरा बघून तुम्हालाही फुटेल घाम

एका प्रोफेशनल फोटोग्राफरने मुंगीचा असा फोटो काढलाय की त्याला अ‍ॅवॉर्ड मिळालाय. महत्त्वाचं म्हणजे तो फोटो पाहिल्यावर ती मुंगी आहे, यावर तुमचा विश्वासच बसणार नाही.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 22 ऑक्टोबर: तुम्ही मुंगी पाहिली असेलच. त्यामुळे ती कशी दिसते हे सांगायची गरज नाही. लाल आणि काळ्या रंगाच्या मुंग्या आपल्याला अनेकदा घरात दिसतात. गोड पदार्थ असले की तिथे बऱ्याचदा मुंग्या गोला होतात. आपल्यापैकी अनेक जण हौशी फोटोग्राफर असतात. त्यामुळे अनेक जण या मुंगीचे किंवा रांगेत चालणाऱ्या मुंग्यांचे फोटो काढत असतात; पण एका प्रोफेशनल फोटोग्राफरने मुंगीचा असा फोटो काढलाय की त्याला अ‍ॅवॉर्ड मिळालाय. महत्त्वाचं म्हणजे तो फोटो पाहिल्यावर ती मुंगी आहे, यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. मुंगीचा तो फोटो पाहिल्यावर तो एखादा मोठा हिंसक प्राणी असल्यासारखं वाटतंय. या संदर्भातलं वृत्त झी न्यूज हिंदीने दिलं आहे. या वर्षीच्या निकॉन वर्ल्ड फोटोमायक्रोग्राफी स्पर्धेसाठी फोटोंची छाननी करण्यात आली. यामध्ये लिथुआनियाचे वाइल्डलाइफ फोटोग्राफर युजेनिजस कवलियाउस्कस यांनी काढलेला मुंगीचा फोटो सर्वोत्तम ठरला आहे. मुख्य म्हणजे या स्पर्धेत एक अट होती, ती अशी की यामध्ये फोटोग्राफर्सना छोट्या सब्जेक्ट्सचे मोठे व झूम फोटो काढायचे होते. युजेनिजस यांनी काढलेल्या फोटोने स्पर्धेच्या सर्व अटी पूर्ण केल्या आणि पुरस्कार प्राप्त केला. छोट्याशा मुंगीचा फोटो काढणाऱ्या युजेनिजस यांना स्पर्धेचे विजेते घोषित करून पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. हेही वाचा: घरात झुरळं सापडली म्हणून महिलेला झाली अटक; नेमकं प्रकरण काय पाहा सविस्तर युजेनिजस यांनी मुंगीच्या चेहऱ्याचा फोटो काढला होता, हा फोटो पाहिल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय. कारण मुंगीला सर्वांनीच पाहिलंय; पण या फोटोत मुंगी जशी दिसते, तशी मुंगी कोणीही आजपर्यंत पाहिली नव्हती. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस जिंकणारा मुंगीचा हा फोटो सध्या वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. मुंगीचा चेहरा पहिल्यांदाच इतक्या समोर, स्पष्टपणे पाहता येणं या फोटोमुळे शक्य झालं आहे. मुंगीचा चेहरा पाहून काही जणांना हॉरर फिल्मची आठवण झाली, तर अनेकांना ही मुंगी पाहिल्यावर गेम ऑफ थ्रोन्समधला ड्रॅगन आठवला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फोटोग्राफरने हा फोटो या वर्षी ऑगस्ट महिन्यात काढला होता. दरम्यान, ही फोटोग्राफी स्पर्धा केवळ मायक्रोस्कोप फोटोग्राफीच्या कलेच्या प्रदर्शनासाठी आयोजित केली जाते. यामध्ये असे फोटो काढले जातात, ज्या बाबी उघड्या डोळ्यांनी पाहता येत नाहीत. यंदाचं पहिल्या क्रमांकाचं बक्षिस मिळवून देणारा फोटो हा खऱ्या अर्थाने भन्नाट फोटो आहे. आपण उघड्या डोळ्यांनी अनेकदा मुंगीला पाहूनही तिचं असं थक्क करणारं रूप पाहता येत नाही

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात