मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /भारीच! फक्त फिल्म पाहा आणि 95 हजार रुपये मिळवा; कंपनीची हटके ऑफर

भारीच! फक्त फिल्म पाहा आणि 95 हजार रुपये मिळवा; कंपनीची हटके ऑफर

तुम्हाला 13 हॉरर फिल्म पाहायच्या आहेत.

तुम्हाला 13 हॉरर फिल्म पाहायच्या आहेत.

तुम्हाला 13 हॉरर फिल्म पाहायच्या आहेत.

मुंबई, 10 सप्टेंबर : सामान्यपणे फिल्म (Film) पाहण्यासाठी आपण तिकीट खरेदी करतो, ज्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. पण समजा जर फिल्म (Movie) पाहण्यासाठी तुम्हाला पैसे द्यायचे नाही आहेत तर तुम्हालाच पैसे मिळणार आहेत सांगितलं तर (Get Money for watching film) . फिल्म प्रेमींसाठीतर ही सुवर्णसंधीच आहे नाही का. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण एका कंपनीने अशी ऑफर दिली आहे (Earn money from watching movie).

फाइनेंसबज कंपनी फिल्म पाहण्यासाठी तुम्हाला पैसे देणार आहे. तुम्हाला 13 फिल्म पाहायच्या आहेत. पण या सर्व फिल्म हॉरर (Horror Movie) आहेत, इतकं लक्षात ठेवा. ही कंपनी हॉरर मुव्ही (Horror film) हार्ट रेट एनालिस्टच्या शोधात. आहेत.

हॉरर मुव्ही पाहण्यासाठी तुम्हाला 1300 डॉलर म्हणजे जवळपास 95 हजारांपेक्षा जास्त रुपये मिळणार आहेत. आता कंपनी इतके पैसे देते ते फक्त फिल्म पाहण्यासाठी नाही तर यावेळी तुम्हाला एक काम करायचं आहे. ते म्हणजे फिटबिट डिव्हाइस घालून तुम्हाला या मुव्ही पाहायच्या आहेत.

हे वाचा - मोदी सरकारला हवीये तुमची एक छोटीशी मदत; 50 हजार रुपयांचं बक्षीसही जारी

हॉरर फिल्म पाहताना आपल्या हृदयाची धडधड वाढते, घाम फुटतो, अंगावर काटा येतो. त्यामुळे कोणती हॉरर फिल्म पाहताना कशी प्रतिक्रिया असते हे तपासलं जाणार आहे. हॉरर फिल्म पाहताना संबंधित व्यक्तीचे हार्ट रेट किती असतात याची नोंद केली जाणार आहे. हॉरर मुव्ही फॅनची प्रतिक्रिया कशी असते याची माहिती कंपनीला हवी आहे.

यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या बजेटच्या 13 हॉरर फिल्म पाहण्यासाठी दाखवल्या जातील. यामध्ये खालील फिल्म्सचा समावेश आहे.

एमिटीविले हॉरर

ए क्वाइट प्लेस

ए क्वाइट प्लेस पार्ट 2

कँडीमॅन

इंसिडियस

द ब्लेयर

विच प्रोजेक्ट

सिनिस्टर

गेट आउट

द पर्ज

पॅरानॉर्मल एक्टिविटी

हॅलोवीन (2018)

हे वाचा - Shocking! मॅकडोनाल्डच्या रोलमध्ये दिसलं निपल; पाहताच हादरलेल्या तरुणाने मग...

आता तुम्ही हॉरर फिल्म पाहून पैसे कमवण्यासाठी इच्छुक असाल तर 26 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुभा आहे. विजेत्या उमेदवाराचं नाव 1 ऑक्टोबरला घोषित केलं जाईल. हॉरर मुव्ही पाहण्याची हिमत दाखवल्याने त्याला 1,300 डॉलर दिले जातील. मुव्ही पाहताना लागणारं फिटबिट आणि 50 डॉलर्सचं गिफ्ट कार्डही दिलं जाणार आहे, असं कंपनीने सांगितलं आहे.

First published:
top videos

    Tags: Film, Money, Movie release