पश्चिमोत्तानासन - पाय पसरून जमिनीवर बसा. पाय ताणलेले असताना आपले गुडघे किंचित वाकवले तरी चालेल. त्यानंतर हात पायाच्या टोकांना लावा आणि शरीर खाली झुकवा. डोकं गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करा. हे आसन किमान 10 सेकंद करायला हवं.
पादहस्तासन - या आसनाची सुरुवात करताना श्वास सोडा आणि आपलं शरीर शक्य तितक्या खाली झुकवून आपलं नाक गुडघ्यांना स्पर्श करेल असा प्रयत्न करा. मांड्या आपल्या छातीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. काही काळ या आसनात राहा.
धनुरासन - पोटावर झोपून सुरुवात करा. आपले गुडघे वरच्या दिशेला वाकवा वाकवल्यानंतर आपल्या हातांनी घोट्यांना धरून ठेवा आणि आपले पाय आणि हात शक्य तितके उंच करा. पायाचे अंगठे धरून धनुष्याकृती पोझिशनमध्ये काही काळ राहता आलं तर उत्तम.
भुजंगासन (कोब्रा पोझ) - पोटावर झोपा. पायाची बोटं जमिनीला टेकवून पाय एकत्र जोडा. एक दीर्घ श्वास घ्या, आपला श्वास रोखून ठेवा आणि नंतर आपलं डोकं, खांदे आणि धड उंच करा आणि हातावर तोलून धरा. 30 अंशांच्या कोनात मान उंच करा पण खात्री करा की तुम्ही तुमची नाभी जमिनीला टेकलेली असू दे. त्यानंतर मोठा श्वास घ्या. श्वास हळूहळू सोडत पूर्वस्थितीत येऊन आसन सोडा.
ताडासन - आपले पाय एकत्र करून सरळ उभे रहा आणि दोन्ही पायांवर वजन समान प्रमाणात संतुलित असायला हवं. दीर्घ श्वास घ्या आणि आपले गुडघे हळूहळू ताठ करून हात उंच करा. दोन्ही पायांच्या बोटावर आपल्या शरीराचं वजन संतुलित करा. आपले हात, छाती आणि खांदे वरच्या दिशेने हवेत. काही सेकंद या स्थितीत रहा.'