मुंबई, 3 डिसेंबर : आपल्याला एकूणच निरोगी आरोग्यासाठी सर्व पोषण तत्वांची आवश्यक असते. कारण व्हिटॅमिन्स, प्रोटिन्स आणि कार्बोहायड्रेट्स हे आपल्या शरीराचा समतोल राखतात. त्यासाठी लोक रोजच्या जेवणात डाळी आणि हिरव्या भाज्यांचा समावेश तर कर्ततातच. त्याचसोबत आणखीही काही पदार्थ जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात तेही खाण्याचा प्रयत्न करतात. असाच एक पदार्थ असतो तो म्हणजे दही.
दही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. आपल्या शरीराला दह्याची खूप गरज असते. यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. दह्यामुळे पचनक्रिया सुधारते. दह्यामधून प्रोटीन, व्हिटॅमिन बी6, बी12, कॅल्शियम मिळते. दह्यामुळे गॅसशी संबंधित समस्याही दूर होतात. दही शरीरातील PH पातळी नियंत्रित करते. तसेच दही दात, नखे आणि हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. मात्र लोकांना पडणारा एक महत्वाचा प्रश्न असा आहे की, दही खावे केव्हा? जेवणापूर्वी की जेवणानंतर..
Health tips: सुपारी खाण्याचे हे फायदे माहीत आहेत का? पोटाच्या समस्या राहतात दूर
दही जेवणानंतर खावं की आधी?
E Times ने यासंदर्भात सविस्तर वृत्त दिले आहे. विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठाने चयापचय स्थितींवर केलेल्या संशोधनानुसार, असे आढळून आले की जेवणापूर्वी दही खाणे हे जेवणासोबत किंवा जेवणानंतर खाण्यापेक्षा चांगले आहे. ज्या स्त्रिया जेवणापूर्वी दही खातात त्यांना आतड्यांवरील जळजळ कमी झाली आणि पच्यनक्रियादेखील सुधारली असेही अभ्यासात आढळून आले आहे.
दह्याचे गुणधर्म थंड असतात. मात्र हिवाळ्यात मध आणि काळी मिरी किंवा भाजलेले जिरे पावडर यांसारखे मसाले मिसळून त्याचे सेवन केल्याने आरोग्यासाठी ते सुरक्षित बनवता येते. जेवणापूर्वी दही खाल्याने तुमची पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता असणाऱ्यांनाही याचा फायदा होतो. संध्याकाळी 5 नंतर किंवा रात्रीच्यावेळी दही खाणे टाळावे.
तुम्हीही जेवणाबरोबर काकडी खाता? लगेच थांबा हे तुमच्या आरोग्यास ठरेल हानिकारक
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle, Winter