ब्रिटन, 16 जुलै : जगातल्या प्रत्येक महिलेला आपण सुंदर दिसावं असं वाटतं. त्यासाठी त्या ब्युटी पार्लरला जातात. काही जणी चेहऱ्यावर विविध सर्जरी करूनही आपला चेहरा सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येकानं आपल्याला सुंदर म्हणावं असं त्यांना वाटतं; पण जगात अशीही एक महिला होऊन गेली, की जिला जगातली सर्वांत कुरुप महिला
(Ugliest Woman In World) असा किताब मिळाला होता. सर्वांत विचित्र गोष्ट अशी, की तिला या किताबामुळे आनंदच झाला होता. तिने या किताबामुळे खूप प्रसिद्धी आणि पैसाही कमावला.
पूर्व लंडनमध्ये
(East London) प्लेस्टोव
(Plaistow) येथे डिसेंबर 1874 ला जन्मलेली मेरी अॅन
(Mary Ann). एका गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या मेरीला आठ भावंडं होती. प्रतिकूल परिस्थितीतही तिने नर्सिंगमध्ये डिग्री मिळवली होती. वयाच्या 29 व्या वर्षी तिचं थॉमस बीवन या व्यक्तीसोबत लग्न झालं.
चार मुलं झाल्यानंतर हळूहळू तिच्या चेहऱ्यामध्ये एक वेगळाच बदल जाणवू लागला. तिच्या शरीराच्या प्रत्येक भागात बदल होऊ लागला. सुरुवातीला कोणाला काहीच कळेना, की मेरीला नेमकं काय झालं आहे. पण नंतर हे स्पष्ट झालं, की तिच्या शरीरातल्या हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे तिला एक विकार झाला होता. त्यामुळे तिचा चेहरा भीतीदायक बनला होता.
हे वाचा - बायकोच्या सौंदर्याचं रहस्य काय? चक्क हातोड्याने नवऱ्याने केला पंचनामा
तिला झालेल्या या विकाराचं नाव Acromegaly Disorder असं होतं. त्यात मानवाच्या शरीरातल्या काही अवयवांचा आकार अनेक पटींनी वाढतो. या विकारात शरीरातल्या हाडांचाही आकार प्रचंड वाढतो. अशा रुग्णाच्या हातापायांसह चेहऱ्याचाही आकार वाढतो. मेरीचा चेहरा भयंकर झाला होता. अचानक ती पुरुषांसारखी दिसू लागली होती.
मेरीच्या आजाराबद्दल कळल्यानंतर काही काळाने तिच्या नवऱ्याचं निधन झालं. त्यानंतर ती खचली होती. पण चार मुलांच्या संगोपनासाठी आपण काहीही करू शकू यावर तिचा विश्वास होता. कुरूपतेमुळे तिला कुठेही काम मिळत नव्हतं. पण पेपरमधल्या एका जाहिरातीने तिचं आयुष्य बदललं. ती जाहिरात होती क्लॉउडे बर्टरम नावाच्या एका सर्कसच्या मालकाची. तो लोकांना हसवण्यासाठी कुरूप दिसणाऱ्या महिलेला सर्कशीत आणू इच्छित होता. मेरीने यासाठी अर्ज केला आणि तिथे ती निवडली गेली. तेव्हापासून ती सर्कसमध्ये लोकांना हसवायचं काम करू लागली.
हे वाचा - मृत व्यक्तीच्या दात, केसांपासून ज्वेलरी; तरुणीला आगळेवेगळे दागिने बनवण्याची आवड
पुरुषासारख्या दिसणाऱ्या या महिलेला पाहण्याची उत्सुकता अनेकांना होती. तिला सर्कशीत पाहण्यासाठी लोक पैसे मोजून येऊ लागले. लोक तिचा अपमान करत आणि त्यासाठी तिला पैसेही देत. आपल्या चार मुलांच्या उज्वल भविष्यासाठी ती स्वतःचा होणारा अपमान सहन करत होती आणि पैसे कमवत होती. हाच विचार करून आपण अपमान करून घेत असल्याचं ती सांगायची. कालांतराने याच विकाराने तिचा मृत्यू झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.