मॅड्रिड, 19 जानेवारी: जगातला सर्वात दीर्घायुषी मनुष्य कोण आहे, कुठे राहतो माहीत आहे का? आपण आयुष्यात किती वर्षे जगणार आहोत याबद्दल कोणालाच ठाऊक नसतं. काही जण प्रत्येक दिवस आपला म्हणून जगून त्याचं सोनं करत असतो. तर काहींचं आयुष्य रडत-खडत सुरू असतं. आपण का जगत आहोत? आपल्या जगण्याचं नेमंक ध्येय काय आहे? हेच त्याला ठाऊक नसतं. जीवन-मरणाच्या या खेळात अनेक जण असे काही दुर्दैवी व्यक्ती असतात ज्यांना खूपच कमी आयुष्य मिळतं. तर फार कमी लोकं अशी आहेत, ज्यांचं आयुष्य शंभरी ओलांडली (World's oldest man) तरी ते टवटवीत असतात. अशाच शंभरी पार केलेल्या जगातील सर्वात वयस्क व्यक्तीचा स्पेनमध्ये (Spain) मृत्यू झाला आहे.
जगातील सर्वात वयस्क व्यक्ती म्हणून गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्स (Guinness World Records) मध्ये नामांकित करण्यात आलेले सॅटर्निनो डे ला फुएंते (Saturnino de la Fuente) यांचं मंगळवारी निधन झालं. ते 112 वर्षांचे होते. पुढच्या महिन्यात ते 113 वा वाढदिवस साजरा करणार होते, अशी माहिती एएफपी या न्यूज एजन्सीनं दिली आहे.
8 मुलं, 14 नातवंडं आणि 22 पणतू
स्पेनच्या ईएफई (EFE) या सरकारी न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार, स्पेनच्या वायव्य भागातील लियोन इथल्या राहत्या घरात सॅटर्निनो डे ला फुएंते (Saturnino de la Fuente) यांचं निधन झालं. गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सने (Guinness World Records) गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये डे ला फुएंते यांना जगातली सर्वात वयस्क व्यक्ती म्हणून नामांकित केलं होतं. मंगळवारी त्यांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली आहे. फुएंते यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1909 मध्ये पुएंते कास्त्रो इथं झाला होता.फुएंते हे चर्मकार होते. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी बुटाच्या कारखान्यात काम करण्यास सुरुवात केली होती. फुएंते यांच्या कुटुंबात पत्नी, आठ मुलं, 14 नातवंडं आणि 22 पणतू आहेत. न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार, बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Senior citizen, Spain