मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

बापरे! जगातील सर्वात महागडी कचऱ्याची पिशवी; किंमत ऐकून हैराण व्हाल!

बापरे! जगातील सर्वात महागडी कचऱ्याची पिशवी; किंमत ऐकून हैराण व्हाल!

कचऱ्याच्या पिशवीवर लाखो रुपयांचा खर्च करण्याचा कोणी विचारही करत नाही. मात्र लोकांच्या मनातही नसणाऱ्या गोष्टींना फॅशनच्या दुनियेत स्थान देण्याचा प्रयत्न फॅशन कंपन्या करतात.

कचऱ्याच्या पिशवीवर लाखो रुपयांचा खर्च करण्याचा कोणी विचारही करत नाही. मात्र लोकांच्या मनातही नसणाऱ्या गोष्टींना फॅशनच्या दुनियेत स्थान देण्याचा प्रयत्न फॅशन कंपन्या करतात.

कचऱ्याच्या पिशवीवर लाखो रुपयांचा खर्च करण्याचा कोणी विचारही करत नाही. मात्र लोकांच्या मनातही नसणाऱ्या गोष्टींना फॅशनच्या दुनियेत स्थान देण्याचा प्रयत्न फॅशन कंपन्या करतात.

    नवी दिल्ली, 6 ऑगस्ट : फॅशनच्या दुनियेत वेगळेपणा टिकवून ठेवण्यासाठी निरनिराळ्या युक्त्या केल्या जात असतात. बलेन्सियागा (Balenciaga) हा अमेरिकन लक्झरी फॅशन ब्रँडही नेहमी त्यांच्या वैविध्यपूर्ण गोष्टींमुळे चर्चेत असतो. कधी फाटलेले, जळालेले बूट तर कधी हिल्स असलेले क्रॉक्स अशा विचित्र वाटणाऱ्या गोष्टीही फॅशनच्या नावाखाली आजवर बलेन्सियागानं आणल्या आहेत. त्यावर कहर म्हणून आता बलेन्सियागानं कचऱ्याची पिशवी (Dustbin Bag) बाजारात आणली आहे. आज तक हिंदीनं याबाबत वृत्त दिलं आहे. कचऱ्याची पिशवी ही रोजच्या जगण्यातली दुर्लक्षित गोष्ट असते. काहीवेळा तर त्यासाठी घरातल्याच एखाद्या प्लास्टिक पिशवीचा किंवा डब्याचा वापर केला जातो. कचऱ्याच्या या पिशवीच्या पॅकेटची किंमत फारतर 50 ते 100 रुपयांपर्यंत असते. मात्र बलेन्सियागा या लक्झरी फॅशन ब्रँडनं जगातली सगळ्यात महागडी कचऱ्याची पिशवी (Trash Bag) बाजारात आणली आहे. या पिशवीच किंमत 1,790 डॉलर म्हणजे जवळपास 1 लाख 42 हजार रुपये इतकी आहे. काही दिवसांपूर्वी बलेन्सियागानं त्यांच्या फॉल 2022- रेडी टू वेअर कलेक्शनमध्ये ही कचऱ्याची पिशवी लाँच केली होती. त्यावेळी मॉडेल्सनी कचऱ्याच्या पिशव्या हातात घेऊन रॅम्पवॉक केला होता. आता ती दुकानात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. ट्रॅश बॅग्जच्या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजली. या पिशव्या काळा, पांढरा, पिवळा आणि निळा या चार रंगांमध्ये उपलब्ध आहेत. पिशवीचं तोंड बांधण्यासाठी एक दोरीही दिलेली आहे. या पिशव्या वाघाच्या बछड्याच्या (Calfskin) चामड्यापासून बनवण्यात आल्या आहेत. पिशव्यांच्या बाहेरच्या बाजूला ग्लॉसी लूक देण्यात आला आहे. यामुळे या पिशव्या छान चमकदार दिसताहेत. सोशल मीडियावर ग्राहकांना या कचऱ्याच्या पिशव्यांवर नापसंतीच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘या कचऱ्याच्या पिशव्या तुम्हाला सुंदर वाटत नसतील, तर तुम्हाला फॅशन कळत नाही’ असं एकानं म्हटलंय. अनेकांनी हे खरंच आहे का असा प्रश्न विचारला आहे. ‘बलेन्सियागामुळे आता कचराही स्टाईलमध्ये बाहेर जाणार’ असं एका युझरनं म्हटलंय. कचऱ्याच्या पिशवीवर लाखो रुपयांचा खर्च करण्याचा कोणी विचारही करत नाही. मात्र लोकांच्या मनातही नसणाऱ्या गोष्टींना फॅशनच्या दुनियेत स्थान देण्याचा प्रयत्न फॅशन कंपन्या करतात. काही वेळा ते यशस्वीही ठरतात. बलेन्सियागाच्या या फॅशनेबल ट्रॅश बॅगला आत्ता तरी युझर्सकडून नाराजीच्या प्रतिक्रिया मिळत असल्या, तरी प्रत्यक्षात त्याची विक्री किती होते, हे लवकरच समजेल. सतत चर्चेत राहण्यासाठी बलेन्सियागा दरवेळी नवीन शक्कल लढवते. आता यापुढे असं आणखी काय पाहायला मिळेल, याकडेही ग्राहकांचं लक्ष लागलं आहे.

    First published:

    Tags: Airbag, Fashion

    पुढील बातम्या