Home /News /lifestyle /

ही तर हद्दच झाली! बुटांमध्ये दारू टाकून विकतेय कंपनी, यूजर्सनी केलं ट्रोल

ही तर हद्दच झाली! बुटांमध्ये दारू टाकून विकतेय कंपनी, यूजर्सनी केलं ट्रोल

ग्राहकांना (Customers) उत्पादनाकडे आकर्षित करण्यासाठी कंपन्या कोणती शक्कल लढवतील हे कोणालाच सांगता येत नाही. फॅशनच्या दुनियेत (Fashion World) असे अनेक प्रयोग वारंवार केले जातात.

मुंबई, 6 ऑगस्ट : ग्राहकांना (Customers) उत्पादनाकडे आकर्षित करण्यासाठी कंपन्या कोणती शक्कल लढवतील हे कोणालाच सांगता येत नाही. फॅशनच्या दुनियेत (Fashion World) असे अनेक प्रयोग वारंवार केले जातात. बीअर उत्पादक कंपन्याही आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक हटके प्रयोग करताना दिसतात. Heineken या प्रसिद्ध बीअर उत्पादक कंपनीने असाच एक विचित्र आणि नावीन्यपूर्ण प्रयोग केला आहे. सध्या सोशल मीडियावर (Social Media) या प्रयोगाची जोरदार चर्चा आहे. या बीअर कंपनीनं विचित्र बूट (Shoes) लॉंच केले आहेत. त्याला हेनीकिक्स (Heinekicks) असं नाव दिलं आहे. या बुटांचं खास असं वैशिष्ट्य आहे. सध्या हे बूट नेटिझन्सचं विशेष आकर्षण ठरले आहेत. स्नीकर्सची (Snickers) आवड असणाऱ्या व्यक्ती हजारो रुपये खर्च करण्यासाठी तयार असतात. तसंच फॅशन जगतात नावीन्याची काही कमतरता नाही. हे नावीन्य अनेकदा विचित्रही असतं. यापू्र्वीदेखील आश्चर्याचा धक्का देणारे नवीन प्रयोग आपण पाहिले आहेत. बॅलेन्सियागाचे पूर्णपणे खराब झालेले स्नीकर्स असोत अथवा मानवी रक्ताने माखलेले लील नास एक्सचे सॅटन शूज असोत, अशा विचित्र उत्पादनांनी ग्राहकांना नेहमीच आकर्षित केलेलं आहे. सध्या असेच बीअरचे बूट चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. हे बूट Heineken या बीअर ब्रँडने लॉंच केले असून त्याला हेनिकिक्स असं नाव दिलं आहे. हेनिकिक्स बूट खास पद्धतीनं तयार करण्यात आले आहेत. मर्यादित एडिशन असलेल्या या बुटांना हिरव्या आणि लाल रंगाचं अस्तर असून त्यांचा रंग पांढरा आहे. या बुटांच्या सोलमध्ये बीअर (Beer) भरण्यात आली आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, एका विशिष्ट सर्जिकल इंजेक्शनचा वापर करून ही बीअर सोलमध्ये भरली गेली आहे. स्नीकर्समध्ये मेटल बॉटल ओपनरदेखील आहे. या विचित्र बुटांचा जोड नेहमीप्रमाणे सोशल मीडिया साइट्सवर वादाचा विषय ठरला आहे. काही जणांनी या बुटाचं कौतुक केलं आहे, तर काहींनी यावरून मीम्स तयार केले आहेत. `हे बूट कमाल आहेत,` असंदेखील एका नेटिझनने म्हटलं आहे. हे कस्टमाइज्ड शूज प्रसिद्ध डिझायनर डॉमिनिक सियाम्ब्रोन ऊर्फ शू सर्जनच्या (Dominic Ciambrone Aka Shoe Surgeon) सहयोगानं या कंपनीने लॉंच केले आहेत. या बुटांचा पहिला लूक शेअर करताना बीअर कंपनीनं एक ट्विट केलं आहे. यात कंपनी म्हणते, `तुमच्यासाठी सोलवर डिझाइन केलेलं हेनिकेन सिल्व्हर, याचा स्मूदनेस तुम्ही जवळून पाहू शकता. प्रसिद्ध डिझायनर डॉमिनिक सियाम्ब्रोन यांच्या सहकार्याने हे डिझाइन केले आहेत. हेनिकिक्स हे तुमच्या रोजच्या वापरासाठीचे बूट नाहीत, परंतु, तुम्हाला अशा प्रकारे रोज बीअरवर चालायलाही मिळत नाही.` एकूणच हे अनोखे आणि विचित्र बूट सध्या नेटिझन्ससह ग्राहकांचंही लक्ष वेधून घेत आहेत.
First published:

पुढील बातम्या