जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Organ Donation Day : मृत्यूनंतर दिला हात; मुंबईत पहिल्यांदाच hand donation

Organ Donation Day : मृत्यूनंतर दिला हात; मुंबईत पहिल्यांदाच hand donation

मुंबईत पहिल्यांदाच हातदान

मुंबईत पहिल्यांदाच हातदान

World organ donation day : मुंबईतील केईएम रुग्णालयात (KEM Hospital) हातदानाची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 ऑगस्ट : रक्तदानाप्रमाणे अवयवदानही (Organ donation) महत्त्वाचं आहे. अवयवदानामुळे अनेकांना नव्याने जीवनदान मिळतं. मृत व्यक्ती अवयवरूपी जिवंत राहतो. ब्रेनडेड रुग्णांचं अवयवदान (World organ donation day) केलं जातं. किडनी, हृदय, यकृत असे अवयव दान करता येतात. दरम्यान मुंबईत (Mumbai)  पहिल्यांदाच हातदानही (Hand donation) यशस्वी जालं आहे. मुंबईत (Mumbai) पहिल्यांदाच हातदान (Hand donation) केल्याची नोंद झाली आहे. मुंबईतील प्रसिद्ध केईएम रुग्णालयात (KEM Hospital) याची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. 2016 पासून हाताचं प्रत्यारोपण करण्याचा परवाना रुग्णालयाकडे आहे. आता ब्रेनडेड ग्रस्त (brain dead) असलेल्या एका तरुणाच्या कुटुंबियांनी सर्व अवयव दान करण्यास सहमती दर्शवली. यात कुटुंबियांनी तरुणाचे दोन्ही हातही दान केलेत. तरुणाच्या कुटुंबियांनी घेतलेल्या निर्णयामुळे जवळपास पाच जणांचं प्राण वाचलेत. या अवयव दानामुळे मुंबईतल्या केईएम रुग्णालयात पहिल्यादा हात दान झाले आहे. परळच्या केईएम रुग्णालयात एका व्यक्तीनं (अवयन दान केलेले कुटुंबियांना दान केलेल्याचं नाव आणि लिंग सांगू इच्छित नव्हते.) स्वतःचे दोन्ही हात दान केले. हाताचं प्रत्यारोपण करण्यासाठी जवळपास 18-24 तास लागतात. या प्रत्यारोपणात दोन मुख्य धमन्या, सहा शिरा, आठ नसा आणि 12 टेंडन्स आणि हाडे जोडली जातात. हे वाचा -  ‘हा’ मित्र कधीच सोडणार नाही साथ; एकटेपणा कायमचा होईल दूर मुंबई लोकल ट्रेनमधून पडलेल्या मोनिका मोरेच्या दोन्ही हाताचं गेल्या वर्षी पहिल्यांदा मुंबईत प्रत्यारोपण करण्यात आलं होतं. मोनिकासाठी चेन्नई ग्लोबल रुग्णालयातून हाताच्या अवयवयाची मदत झाली होती. अवयवदानाच्या या कार्यक्रमात मुंबईत गेल्या 24 वर्षात शेकडो मूत्रपिंड, फुफ्फुस, यकृत आणि हृदय प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडले. मात्र हात दानाची पहिली यशस्वी नोंद आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात