जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / World Mosquito Day: डासांमुळे दरवर्षी जगभरात लाखो लोक गमावतात जीव; असा करा स्वतःचा बचाव

World Mosquito Day: डासांमुळे दरवर्षी जगभरात लाखो लोक गमावतात जीव; असा करा स्वतःचा बचाव

World Mosquito Day: डासांमुळे दरवर्षी जगभरात लाखो लोक गमावतात जीव; असा करा स्वतःचा बचाव

मलेरियासह डासांमुळे होणाऱ्या सर्व आजारांबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी ‘जागतिक डास दिवस’ (World Mosquito Day) साजरा केला जातो

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई 20 ऑगस्ट : जगभरात दरवर्षी लाखो लोक डासांच्या चाव्यामुळे आपला जीव गमावतात. डास चावल्याने मलेरिया (Malaria), डेंग्यू (Dengue), चिकनगुनियासह अनेक आजार पसरतात. यापैकी मलेरिया होणाऱ्यांची संख्या सर्वांत जास्त आहे. तुम्हाला हे जाणून कदाचित नवल वाटेल की मलेरियामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होतो. मलेरियासह डासांमुळे होणाऱ्या सर्व आजारांबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी ‘जागतिक डास दिवस’ (World Mosquito Day) साजरा केला जातो. ब्रिटिश सर्जन सर डोनाल्ड रॉस यांनी 1897 मध्ये डास आणि मलेरिया यांच्यातील संबंध शोधून काढला होता. मलेरियामुळे दरवर्षी होतो लाखो लोकांचा मृत्यू वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (WHO) अहवालानुसार, 2020 मध्ये जगभरात मलेरियाची 24 कोटींपेक्षा जास्त प्रकरणं नोंदवली गेली. त्यापैकी सुमारे 6.27 लाख लोकांचा या आजारामुळे मृत्यू झाला. तर 2019 मध्ये, जगभरात मलेरियाच्या 22 कोटी रुग्णांची नोंद करण्यात आली होती आणि त्यापैकी 5 लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. आफ्रिकन देशांमध्ये (African Countries) मलेरियाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. भारतातदेखील या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडतात. ‘या’ आजारांना कारणीभूत ठरतात डास World Mosquito Day 2022: डास वजनाच्या तिप्पट माणसाचं रक्त शोषतात, मादीच आणते जेरीस डास चावल्यामुळे मलेरिया सर्वात जास्त प्रमाणात पसरतो. मलेरियाच्या पॅरासाइटचा संसर्ग झालेला डास एखाद्या व्यक्तीला चावल्यास मलेरिया पसरतो. याशिवाय डेंग्यू आणि चिकुनगुनिया आजार होण्यासही डास कारणीभूत आहेत. डासांच्या विविध प्रजाती अनेक गंभीर आणि धोकादायक आजारांना जन्म देतात. त्यामुळे काळजी घेणं खूप गरजेचं आहे. डास का चावतात? डासांच्या 3500 पेक्षा जास्त प्रजाती आहेत, त्यापैकी फक्त मादी डासांच्या काही प्रजाती माणसांना चावतात. मादी डासांना त्यांच्या अंड्यांसाठी प्रोटिनची गरज असते आणि त्यांना मानवी रक्तातून ते प्रोटिन मिळतात. यामुळेच त्वचेवर सुईप्रमाणे डंक मारून डास लोकांना चावतात. डास चावल्यानंतर त्वचेवर खाज सुटणं, सूज येणं अशी लक्षणं दिसतात आणि इतर गंभीर इन्फेक्शन्स होतात. डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया हे डासांमुळे पसरणारे आजार आहेत. काही आफ्रिकन देशांमध्ये डासांमुळे पिवळा ताप पसरतो. बापरे! आता मासे-खेकड्यांनाही कोरोना? कोव्हिड टेस्टचा VIDEO आला समोर डासांपासून असा करा बचाव जास्त डास असलेल्या ठिकाणी जाऊ नका, संपूर्ण शरीर झाकणारे कपडे घाला, मॉस्किटो रेपेलंट क्रीम क्रीम किंवा तेल लावा, रात्री मच्छरदाणी वापरा, घर आणि परिसर स्वच्छ ठेवा, तुमची प्रतिकारशक्ती (Immunity) मजबूत ठेवा आणि आजाराची लक्षणं आढळल्यास डॉक्टरांना भेटून योग्य सल्ला, उपचार घ्या. या काही गोष्टींच्या मदतीने तुम्ही डासांपासून स्वतःचा बचाव करू शकता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात