मुंबई, 04 ऑक्टोबर : शालेय जीवनात अनेक गोड-कटू अनुभव मिळत असतात. मित्र-मैत्रिणींसोबत मनसोक्त जगलेले ते शालेय जीवनातले क्षण आयुष्यभर स्मरणातही राहतात; पण शाळेत एकमेकांशी मैत्री करणं, टाळी देणं अशा गोष्टींवर बंदी असेल किंवा वॉशरूमला जाण्यासाठीचे नियमही कडक असतील तर अशा शाळेत जाण्यास निश्चितच कोणालाही आवडणार नाही. असे विचित्र नियम व अटी असलेल्या शाळा अस्तित्वात असतील का, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो; पण वास्तवात जगात अशा शाळा आहेत. जाणून घेऊ या अशा शाळांच्या वेगळ्या आणि विचित्र नियमांबद्दल ब्रिटनच्या थॉमस स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मैत्री करण्याची परवानगी नाही. मित्र एकमेकांपासून दूर गेल्यानंतर त्यांच्यात एकटेपणा वाढत जातो. त्यामुळे त्यांच्यात मैत्रीचं अतूट नाते निर्माण होऊ नये असं थॉमस स्कूलच्या प्रशासनाला वाटतं. जपानच्या शाळेत नो मेकअप जपानच्या हायस्कूलमध्ये ड्रेस कोडचे कडक नियम लागू आहेत. केस किती लांब असावेत, नखं कशी असावेत यासाठीही या शाळेत नियम घालून दिलेले आहेत. अनेक शाळांमध्ये तर मेकअप, नेल पॉलिश, तसंच कान, नाक टोचणं आदींवर बंदी आहे. काही शाळांत तर विद्यार्थ्यांत मैत्रीचं नाते असण्यावर प्रतिबंध आहे. यामुळे विद्यार्थ्यांचं लक्ष विचलित होतं आणि शाळेतून विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण वाढत असल्याचं शाळेचं म्हणण आहे. हेही वाचा - भारतात काही आदिवासी स्वतःला महिषासुराचे पूर्वज का मानतात? कारण आहे विशेष मित्राची गळाभेट घेण्यावर बंदी जिवलग मित्र भेटले की ते एकमेकांना आलिंगन देतात. एखाद्या गोष्टीवर बऱ्याचदा मित्राला टाळी दिली जाते. परंतु जगातल्या अनेक शाळांत टाळी देण्यासही बंदी आहे. यात ब्रिटन आणि अमेरिकेच्या अनेक शाळांचा समावेश आहे. तिथल्या शाळांमध्ये टाळी देणं किंवा गळाभेट घेण्याची परवानगी नाही. वॉशरूमला जाण्यावर मर्यादा अमेरिकेतल्या शिकागो शहरातल्या एव्हरग्रीन पार्क हायस्कूलमध्ये वॉशरूममध्ये जाण्यावर मर्यादा आहे. एनबीसी टीव्ही नेटवर्कच्या बातमीनुसार, विद्यार्थी जास्तीत जास्त तीन वेळा वॉशरूमला जाऊ शकतात. महत्त्वाचा वेळ विद्यार्थ्यांनी व्यर्थ घालवू नये म्हणून हा नियम करण्यात आल्याचं शाळेचं म्हणणं आहे. इथं मुलं दुपारी घेतात झोप चीनमध्ये गाओनक्सिन नंबर 1 एलिमेंटरी स्कूलमध्ये विद्यार्थी दुपारी 12.10 ते 2 वाजेपर्यंत दुपारचं जेवतात व झोप घेतात. विद्यार्थ्यांचा मूड चांगला राहावा म्हणून शाळेकडून हा नियम करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना शिस्त लागावी म्हणून शाळांकडून वेगवेगळे नियम केले गेले आहेत. परंतु विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं हे नियम अधिक जाचक ठरू शकतात, असं तज्ज्ञांना वाटत आहे. उलट विद्यार्थ्यांना विविध गोष्टी शिकण्यासाठी आणि त्यांच्यातल्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना शैक्षणिक दृष्टिकोनातून आवश्यक तेवढी मोकळीक दिली जाणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञ नेहमी सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.