Home /News /lifestyle /

दीर्घकाळ Work From Home करताय? वेळीच सावध व्हा! ह्या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

दीर्घकाळ Work From Home करताय? वेळीच सावध व्हा! ह्या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

घरातून काम करताना (Work From Home) अनेकांना शारीरिक आणि मानसिक बदल जाणवत आहेत. यात आपल्या काही चुकींच्या सवयीचाही परिणाम आहे. तुम्हालाशी अशा काही सवयी असतील तर आत्ताच बदल करा.

  मुंबई, 18 डिसेंबर : Work From Home Sitting Posture: कोरोना महामारीने (COVID19 Pandemic) सर्वांनाच आपल्या घरात दीर्घकाळापासून बंदिस्त केलंय. जास्त वेळ बसणे हा आजकाल जीवनशैलीचा एक भाग बनला आहे. विशेषत: कोरोना विषाणूच्या साथीच्या आगमनानंतर अनेक संस्थांनी त्यांच्या कर्मचार्‍यासाठी एक पर्याय म्हणून घरून काम (Work From Home) करण्यास परवानगी दिली. आता मोठ्या प्रमाणात हा सवयीचा भाग झाला आहे. मात्र, याचे आता दुष्परिणाम समोर आले आहेत. अलीकडेच झालेल्या एका अभ्यासात जास्त वेळ बसल्याने तुमच्या मानसिक आणि शारीरीक आरोग्यावर वाईट परिणाम होत असल्याचे समोर आलं आहे. हर्ड्सफील्ड युनिव्हर्सिटीने जास्त तास बसणाऱ्या लोकांवर अभ्यास केला, त्यात असे आढळून आले की जे लोक आठ तासांपेक्षा जास्त वेळ बसून काम करतात किंवा घरातून काम केल्यामुळे बराच वेळ घरी राहतात, त्यांच्या मानसिक आरोग्यावर त्याचा घातक परिणाम झाला आहे. स्पोर्ट सायन्सेस फॉर हेल्थ या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. वजन वाढणे लॉकडाऊनमध्ये क्वचितच कोणाचे वजन वाढले नसेल. कारण, घरी असल्याने आपल्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. अनहेल्दी अन्न खाल्ल्याने वजन वाढते. म्हणूनच घरच्या घरी काही वेळ व्यायाम करणे महत्वाचे आहे. सकस आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या. यामुळे तुमचे वजन वाढणार नाही. व्यायामामुळे तुम्ही तणावापासूनही दूर राहाल. याशिवाय तुम्ही योगाही करू शकता. स्नायू आणि पाठदुखी तासनतास एकाच जागी बसल्यामुळे अनेकांनी पाठदुखीची समस्या येत आहे. तुम्ही 90 अंशाच्या कोनात योग्य मुद्रेत बसता. यामुळे तुम्हाला पाठदुखीचा त्रास होणार नाही. याशिवाय काही तास स्ट्रेचिंग करा. कामाच्या दरम्यान शक्य तितके पाणी प्या जेणेकरून तुमचे शरीर हायड्रेटेड राहील. डीप वेन थ्रोम्बोसिन (DVT) तुम्ही अनेक तास एकाच जागी बसून राहिल्यास तुम्ही डीप वेन थ्रोम्बोसिन (DVT) चे बळी होऊ शकता, ज्यामुळे तुमचा जीवही जाऊ शकतो. या आजारात तुमच्या पायांच्या नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होतात, त्यामुळे पाय दुखतात आणि सूज येते. बहुतेक लोक त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. शरीरात रक्त जमा झाल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता जाणवते. ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो. Air Pollution चा नियमित व्यायाम करणाऱ्यांवरही होतो असा परिणाम - नवीन संशोधन संगणक सिंड्रोम लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर कामाच्या वेळेमुळे लोक कॉम्प्युटर सिंड्रोमला बळी पडत आहेत. त्याचा थेट परिणाम तुमच्या डोळ्यांवर होतो. नित्यक्रमात व्यायामाचा समावेश करा अभ्यासात असेही दिसून आले आहे की जर तुम्ही आठ तासांपेक्षा जास्त वेळ बसलात तर तुम्हाला तुमचे शरीर निरोगी ठेवण्यासाठी जास्त वेळ व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यात असे म्हटले आहे की, अशा परिस्थितीत तुमच्यासाठी तंदुरुस्त राहण्यासाठी आदर्श स्थिती ही आहे की तुम्ही दिवसातून 60 मिनिटे व्यायाम करा. मात्र, जर तुम्ही हे करू शकत नसाल, तर कोणत्याही स्थितीत 30 मिनिटांपेक्षा जास्त व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो.
  घरकाम किंवा बागकामत मदत करा तुम्हाला घरातून बाहेर पडता येत नसेल तर तुम्ही घरकाम किंवा बागकामात मदत करू शकता. छोटी परसबाग असेल तर उत्तम. यामुळे तुम्हाला काही काळ निसर्गाच्या सानिध्यात गेल्याचा अनुभव मिळेल. यामुळे शरीराच्या व्यायामासोबत मनालाही प्रसन्न वाटेल.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Pandemic, Work from home, Workload

  पुढील बातम्या