जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Air Pollution चा नियमित व्यायाम करणाऱ्यांवरही होतो असा परिणाम; नवीन संशोधनातील माहिती

Air Pollution चा नियमित व्यायाम करणाऱ्यांवरही होतो असा परिणाम; नवीन संशोधनातील माहिती

Air Pollution चा नियमित व्यायाम करणाऱ्यांवरही होतो असा परिणाम; नवीन संशोधनातील माहिती

Air Pollution Reduces Benefits of Exercise: या अभ्यासाठी UK Biobank च्या मोठ्या बायोमेडिकल डेटाबेसमधून संशोधकांनी 8 हजारांहून अधिक लोकांच्या डेटाचे विश्लेषण केले. या लोकांचे सरासरी वय 56 वर्षे होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 18 डिसेंबर : वायू प्रदूषण (Air Pollution) हे अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकते. त्याचा आपल्या शरीरावर अनेक प्रकारे परिणाम होतो. यासंदर्भात आता आणखी एक चिंताजनक बाब समोर आली आहे. अमेरिकेतील टक्सन येथील अॅरिझोना विद्यापीठातील (University of Arizona) संशोधकांनी त्यांच्या संशोधनाच्या आधारे असा निष्कर्ष काढला आहे की, जे लोक जास्त वायू प्रदूषण असलेल्या भागात राहतात, त्यांच्या मेंदूला व्यायाम आणि शारीरिक हालचालींचा कमी फायदा होतो. हे संशोधन जर्नल ऑफ न्यूरोलॉजीमध्ये (Neurology Journal) प्रकाशित झालं (Air Pollution Reduce Benefits of Exercise) आहे. या अभ्यासाठी UK Biobank च्या मोठ्या बायोमेडिकल डेटाबेसमधून संशोधकांनी 8 हजारांहून अधिक लोकांच्या डेटाचे विश्लेषण केले. या लोकांचे सरासरी वय 56 वर्षे होते. संशोधकांनी नायट्रोजन डायऑक्साइड (Nitrogen dioxide) आणि पार्टिक्युलेट मॅटरचा (Particulate Matter) लोकांवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास केला. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक हालचाल मोजण्यासाठी त्यांच्या शरीरावर एक उपकरण बसवण्यात आले होते. त्यांनी किती वेळ हार्ड व्यायाम केला हे संशोधकांनी पाहिले. तज्ञ काय म्हणतात? ऍरिझोना विद्यापीठातून पीएचडी घेतलेल्या आणि या अभ्यासाच्या लेखिका मेलिसा ए. मेलिसा ए. फर्लाँग (Melissa A. Furlong) यांच्या मते, वायू प्रदूषणाच्या ठिकाणी जास्त व्यायाम केल्याने धोका वाढू शकतो आणि पूर्वीच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की वायू प्रदूषणाचा मेंदूवर विपरीत परिणाम होतो. अशाप्रकारे हे स्पष्ट होते की वायुप्रदूषण व्यायामाचे फायदे कमी करण्याचे काम करते. प्रदूषणाचा किती परिणाम होतो दर आठवड्याला हार्ड व्यायाम करणाऱ्यांच्या मेंदूमध्ये अनेक सकारात्मक बदल झाल्याचे संशोधकांना आढळून आले. दुसरीकडे, जे लोक भरपूर वायू प्रदूषण असलेल्या भागात राहत होते, त्यांच्या मेंदूतील ते सर्व सकारात्मक बदल दिसले गेले नाहीत. हे वाचा -  Health Care Tips: निरोगी राहण्यासाठी चुकूनही या गोष्टी रिकाम्या पोटी खाऊ नका, या आजारांचा धोका अभ्यासात काय झाले मेलिसा ए. फर्लाँग यांच्या मते, ‘अभ्यासादरम्यान, कमी वायुप्रदूषण असलेल्या भागात शारीरिक हालचालींचा संबंध मेंदूच्या फायद्यांशी संबंधित असल्याचे आम्ही पाहिले. त्याचबरोबर वायू प्रदूषणाच्या उच्च पातळीत व्यायामामुळे मेंदूला होणारे अनेक फायदे दिसत नव्हते. त्या पुढे म्हणाले की, लोकांनी व्यायाम करू नये असे आम्ही म्हणत नाही. आमच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, वायू प्रदूषणाचा मेंदूच्या आरोग्यावर फारसा परिणाम होत नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर, वायुप्रदूषणाचा नकारात्मक परिणाम हा एक वर्षाच्या वृद्धत्वाच्या परिणामाच्या निम्मा होता. हे वाचा -  Breakfast Egg Recipes: हेल्दी आरोग्यासाठी ब्रेकफास्टमध्ये अंड्याच्या या 6 रेसिपींचा करा समावेश ते पुढे म्हणाले, ‘दुसरीकडे, हार्ड व्यायामाचे फायदे यापेक्षा खूप जास्त आहेत. यामुळे व्यक्ती वयापेक्षा तीन वर्षे लहान वाटते. त्यामुळे वायुप्रदूषणामुळे व्यायाम टाळणे चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात