मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Women’s health Check-up : वयाचा 20 ते 30 दरम्यान महिलांनी आवर्जुन करा या 5 टेस्ट

Women’s health Check-up : वयाचा 20 ते 30 दरम्यान महिलांनी आवर्जुन करा या 5 टेस्ट

विशेषतः महिलांना आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करत राहणं गरजेचं असतं. (Women’s health) ज्यामुळे भविष्यात होणारे गंभीर आजार टाळणं शक्य होईल.

विशेषतः महिलांना आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करत राहणं गरजेचं असतं. (Women’s health) ज्यामुळे भविष्यात होणारे गंभीर आजार टाळणं शक्य होईल.

विशेषतः महिलांना आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करत राहणं गरजेचं असतं. (Women’s health) ज्यामुळे भविष्यात होणारे गंभीर आजार टाळणं शक्य होईल.

कोरोनामुळे लोक आपल्या आरोग्याबाबत अधिक जागरुक झाले आहेत. अगोदर केवळ आजारी पडल्यानंतरच डॉक्टरांकडे जाणाऱ्या लोकांनाही नियमित आरोग्य तपासणीचं महत्त्व समजलं आहे. कित्येक वेळा आपल्या शरीरामधल्या काही बदलांकडे आपण दुर्लक्ष करतो. तरुण असल्यामुळे अनेक जण छोटे-मोठे आजार अंगावर काढतात; मात्र तसं न करता लहान-सहान लक्षणं दिसताच आपण डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे. विशेषतः महिलांना आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करत राहणं गरजेचं असतं. (Women’s health) ज्यामुळे भविष्यात होणारे गंभीर आजार टाळणं शक्य होईल. कित्येक वेळा महिलांना असं वाटतं, की २० ते ३० वर्षे वयादरम्यान आपल्याला कोणताही गंभीर आजार होऊ शकत नाही; मात्र या वयात तुम्ही आपल्या तब्येतीची काळजी कशी घेत आहात यावरच भविष्यात तुमचं आरोग्य कसं असेल हे ठरतं. भारताच्या नॅशनल हेल्थ पोर्टलने (National Health portal) दिलेल्या माहितीनुसार, २० ते ३० वर्षे वयोगटातल्या महिलांनी काही तपासण्या करणं आवश्यक आहे. 'झी न्यूज'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. लोकांनी केवळ आपल्या आरोग्याबाबत जागरूक होऊन, नियमित वैद्यकीय तपासणी करावी या उद्देशाने ही माहिती देण्यात येत आहे. हे ही वाचा- या पोर्टलवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, महिलांनी नियमितपणे आपलं वजन तपासलं पाहिजे. तुमचा बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) गरजेप्रमाणेच असायला हवा. असं नसल्यास, भविष्यात अनेक गंभीर आजारांना सामोरं जावं लागेल, असा इशारा पोर्टलने दिला आहे. यासोबतच, महिलांनी नियमितपणे आपला रक्तदाब, म्हणजेच ब्लड प्रेशरही तपासलं पाहिजे, असंही त्यात म्हटलं आहे. असं केल्यास उच्च रक्तदाबामुळे होणारे हृदयाचे आजार टाळण्यास मदत होते. हे ही वाचा-सावधान!पावसाळ्यात मासिक पाळीच्या काळात होऊ शकतं इनफेक्शन; अशा प्रकारे घ्या काळजी डोळ्यांची तपासणी करून घेणंही आवश्यक असल्याचं पोर्टलवर सांगण्यात आलं आहे. डोळ्यांना कोणताही त्रास होत नसला, तरी तीन वर्षांमधून एकदा नेत्रतपासणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यातला धोका टाळता येईल. २० वर्षांवरच्या सर्व महिलांनी आपली कोलेस्टेरॉल चाचणी करून घ्यावी असंही या पोर्टलवर सांगण्यात आलं आहे. दर पाच वर्षांनी ही चाचणी करण्याचा सल्ला नॅशनल हेल्थ पोर्टलने दिला आहे. यासोबतच, बऱ्याच वेळा महिला ब्रेस्ट एक्झाम (Breast Exam), पेल्व्हिक एक्झाम (Pelvic Exam) आणि पॅप टेस्ट (Pap test) करण्यास कचरतात; मात्र तसं न करता महिलांनी नियमितपणे या चाचण्या करणं आवश्यक आहे. यामुळे भविष्यात ब्रेस्ट कॅन्सर आणि वंध्यत्वासारख्या परिणामांचा धोका कमी करता येऊ शकतो. यासोबतच दर तीन वर्षांनी पॅप स्मिअर टेस्ट करणं आवश्यक असल्याचंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
First published:

Tags: Fitness test, Health, Women

पुढील बातम्या