दिल्ली, 11 मार्च: खरं तर रंगांची (Colour) ओळख आपल्याला फार कमी वयात होते. रंगांच्या विविध छटा आपण अगदी सहजपणे ओळखू शकतो; पण रंगांच्या विविध छटा ओळखण्याबाबत आता एक आश्चर्यकारक माहिती संशोधनातून समोर आली आहे. स्त्रियांना (Women) रंगांचं ज्ञान अधिक असतं. एकाच रंगाच्या वेगवेगळ्या छटा त्या बिनचूक ओळखू शकतात. विशेष म्हणजे पुरुषांच्या (Men) तुलनेत स्त्रियांमध्ये रंग ओळखण्याची क्षमता अधिक असते, असं संशोधनातून स्पष्ट झालं आहे. या संशोधनाविषयीचं वृत्त `टीव्ही नाइन हिंदी`ने प्रसिद्ध केलं आहे. पुरुषांच्या तुलनेत मुली किंवा स्त्रियांना रंगज्ञान अधिक असल्याचं संशोधनातून दिसून आलं आहे. मुली एकसारख्या रंगातला अगदी सूक्ष्म फरक बिनचूक ओळखू शकतात. अर्थात या गोष्टीमागे एक वैज्ञानिक (Scientific) कारण आहे. न्यूयॉर्क (New york) इथल्या ब्रुकलिन कॉलेजने महिला आणि पुरुषांच्या रंग ओळखण्याच्या कौशल्याबाबत अभ्यास केला. या अभ्यासातून अगदी स्पष्ट स्वरूपात नसल्या तरी काही बाबी निश्चितच समोर आल्या. त्याचप्रमाणे Color-meanings.comवर प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया अधिक वेगानं रंग ओळखू शकतात. त्यांची रंग ओळखण्याची क्षमता अधिक असते. स्त्रिया एका रंगाच्या अनेक शेड्स (Sheds) बिनचूक ओळखू शकतात आणि विशेष म्हणजे त्यांना विविध शेड्सची नावंही माहिती असतात.
फेअरनेस क्रिममध्ये होतोय या घातक घटकाचा अतिवापर; खरेदी करताना नक्की तपासा या गोष्टीरंग ओळखण्याबाबत करण्यात आलेल्या संशोधनातून मिळालेल्या पुराव्यानुसार, पुरुष आणि स्त्रिया समान रंग वेगवेगळ्या प्रकारे ओळखतात. पुरुष एखाद्या रंगाकडे अगदी वरवर पाहतात, तर महिला त्या रंगाच्या विविध शेड्स अगदी बिनचूक ओळखू शकतात. इतकंच नाही, तर रंगांमधला फरक ओळखण्यातही स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक सरस असतात.
याबाबत ब्रुकलिन कॉलेजने केलेल्या संशोधनात नमूद करण्यात आलं आहे, की रंगांची ओळख पुरुष आणि स्त्रियांमध्ये भिन्न असलेल्या हॉर्मोन्सशी (Hormones) संबंधित आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, पुरुष आणि स्त्रियांच्या विकासाच्या सुरुवातीच्या काळात टेस्टोस्टेरॉनचं (Testosterone) एक्स्प्रेशन मेंदूच्या व्हिज्युअल कॉर्टेक्समधल्या न्यूरॉन्सवर परिणाम करतात. Shocking! बाळाला जन्म देताना अचानक बाहेर आले डोळे; प्रसूतीवेळी धक्कादायक प्रकार त्यामुळे महिलांना रंगाची अचूक पारख असते. उदाहरण द्यायचं झालं, तर लाल रंग किंवा इतर कोणत्याही रंगातल्या छटा ओळखणं पुरुषांना अडचणीचं जातं; पण स्त्रिया मात्र लाल रंगाचे चेरी रेड, रोज रेड, जॅम रेड, गार्नेट रेड, रुबी रेड, स्कार्लेट रेड, वाइन रेड, अॅपल रेड, ब्लड रेड, सांगरिया रेड, बेरी रेड, ब्लश रेड असे प्रकार अगदी सहजपणे ओळखू शकतात. पुरुष मात्र यातली कोणतीही छटा पाहून लाल रंग असल्याचंच सांगतात. रंगांची अचूक ओळख असल्याने स्त्रिया त्याच आधारे शॉपिंग (Shopping) करताना दिसतात.