जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / ऐकावं ते नवलच! स्वत: वापरलेले कपडे विकून महिला कमवतेय लाखो रुपये

ऐकावं ते नवलच! स्वत: वापरलेले कपडे विकून महिला कमवतेय लाखो रुपये

ऐकावं ते नवलच! स्वत: वापरलेले कपडे विकून महिला कमवतेय लाखो रुपये

ही महिला स्वतःचे घातलेले कपडे ऑनलाइन विकत आहे. ही महिला 22 वर्षांची असताना तिने हे काम सुरू केलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

एखाद्याने घातलेले कपडे (Used clothes) विकत घेऊन कोणी घालतं का? आता तुम्ही म्हणाल नाही. पण जरा थांबा. हे खरंय. एक अशी महिला आहे जी तिचे घातलेले कपडे विकून महिन्याला चार लाख रुपये कमवत आहे. वेबसाईट मेट्रोच्या रिपोर्टनुसार ही महिला साईड बिझनेस (Side Business) म्हणून हे काम करत आहे. याबाबत आजतकनं वृत्त दिलंय. आणि हो या बातमीवर तुमचा विश्वास बसत नसेल तर जाणून घ्या या महिलेबद्दल. ही महिला स्वतःचे घातलेले कपडे ऑनलाइन विकत आहे. ही महिला 22 वर्षांची असताना तिने हे काम सुरू केलं. त्यावेळी ती कॉलेजमध्ये होती. तिला पैशांची गरज होती आणि तिने कपडे विकण्यास सुरुवात केली. ती सांगते की, पहिल्यांदा तिला तिच्या मित्र-मैत्रिणींकडून (Friends) कळलं की लोक वापरलेल्या वस्तू ऑनलाइन (Online Selling) विकतात. त्यानंतर तिने हे काम कसं असतं आणि कसं चालतं याबाबत माहिती घेतली. यावेळी मुली स्वतःची अंतर्वस्त्र (Under Garments) विकून चांगले पैसै कमवत असल्याचं तिला आढळलं. मात्र, हे काम करण्यात तिला संकोच वाटत होता. त्यामुळे तिने ते काम प्रत्यक्षपणे न करण्याचा विचार केला. याबाबत तिच्या मनात घरचे काय म्हणतील, मित्र-मैत्रिणी काय विचार करतील असे अनेक विचार आले. मग तिने या विषयाचा थोडा अभ्यास केला आणि पैसे कमवण्यासाठी कपडे विकण्याचं काम करण्यासाठी स्वतःला तयार केलं. हे ही वाचा- बायकोसाठी थेट मोबाईल टॉवरवर चढला नवरा, ती खाली दिसताच…; काय घडलं पाहा VIDEO या महिलेनं सांगितलं की तिने सुरुवातीला वापरलेल्या वस्तूंची खरेदी-विक्री करण्यासाठी इच्छूक लोकांना जोडणारी एक वेबसाईट शोधली. तिथे स्वतःचं प्रोफाईल क्रिएट केलं. आधी फक्त स्वतःच नाव आणि वय टाकलं. त्यानंतर थोडं घाबरतच स्वतःचा फोटो टाकला. ती म्हणते ‘हे माझ्यासाठी खूप भयावह होतं. कारण याआधी मी केवळ माझ्या बॉयफ्रेंडलाच माझा फोटो पाठवला होता. मात्र, इथे ऑनलाइन सर्वजण माझा फोटो (My photo) पाहू शकणार होते. पहिला फोटो टाकल्यानंतर मी खूप टेंशनमध्ये होते, मला वाटलं मी हे करायला नको. मात्र मला पैसे पाहिजे होते त्यामुळे मी माझ्या निर्णयावर ठाम राहिले. एका आठवड्यानंतर माझा पहिला ड्रेस 7 हजार रुपयाला विकला गेला. पहिला ड्रेस विकला गेल्यानंतर माझा कॉन्फिडन्स वाढला. माझ्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले. त्यानंतर मी हे काम वाढवलं.’ ही महिला सांगते की, तिचे नियमित 20 ग्राहक आहेत जे दर महिन्याला तिने घातलेले कपडे खरेदी करतात. त्यापैकी बरेच जण तिच्या ओळखीचे झाले आहेत. तिची महिन्याची कमाई सध्या दीड लाखांच्या घरात आहे. कधी-कधी ती महिन्याकाठी 4 लाख रुपयेदेखील कमवते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात