Home /News /lifestyle /

आधीच तब्बल 242 किलो वजन आणि म्हणे अजून वाढवायचंय; पण कशासाठी? कारण वाचून व्हाल थक्क

आधीच तब्बल 242 किलो वजन आणि म्हणे अजून वाढवायचंय; पण कशासाठी? कारण वाचून व्हाल थक्क

ती लठ्ठ असूनही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न न करता दररोज प्रचंड आहार घेते.

    लठ्ठपणा (Obesity) हे शेकडो व्याधींचं मूळ आहे, असं म्हटलं जातं. त्याचा अनुभव अनेक जण घेत असतात. अनेकांना लठ्ठपणामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या सोसाव्या लागतात. त्यांना सहजपणे चालता-फिरता येत नाही. त्यांना कायमच थकल्यासारखं वाटत असतं. या सगळ्या समस्यांची तीव्रता कमी व्हावी, म्हणून लठ्ठ व्यक्ती आपलं वजन कमी करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत असतात. पेनसिल्व्हानिया (Pennsylvania) येथे राहणाऱ्या बोब्बी या 46 वर्षांच्या महिलेचा मात्र या गोष्टीला अपवाद आहे. कारण तिचं वजन 242 किलो असूनही तिला आपलं वजन कमी करण्याची अजिबात इच्छा नाही. किंबहुना तिला वजन आणखी वाढवायचं असून, जगातली सर्वांत लठ्ठ महिला हा मान आपल्याला मिळावा, यासाठी ती प्रयत्नशील आहे. त्यामुळे ती लठ्ठ असूनही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न न करता दररोज प्रचंड आहार घेते. वर्ल्ड रेकॉर्ड (World Record) आपल्या नावावर होण्यासाठी बोब्बी खूप खाते. त्यामुळे साहजिकच तिचं वजन खूप वाढत आहे. आपण लवकरच आधीच्या व्यक्तीचा विक्रम मोडू शकू, असा विश्वास तिला वाटतो. बोब्बीची कंबर सध्या 95 इंच आहे आणि ती 99 इंच व्हावी, अशी तिची इच्छा आहे. लॉस एंजलीसमध्ये राहणाऱ्या मिकेल रुफ्फिनेल्लीचा (Mikel Ruffinelli) विक्रम आपण लवकरच मोडू शकू, असं तिला वाटतं. एरव्ही लठ्ठ लोकांना पदोपदी टोमणे ऐकून घ्यावे लागतात, अपमान सहन करावे लागतात; मात्र लठ्ठपणा हे बोब्बीच्या लोकप्रियतेचं कारण आहे. तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असून, अनेक चाहते तिचे फोटोज आणि व्हिडिओज खरेदीही करतात. ऑनलाइन माध्यमात लोकप्रिय असलेली बोब्बी आपल्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी त्यांच्या मागण्या पूर्ण करते. खुर्च्यांवर बसून त्या मोडण्यासारख्या मागण्यांचा त्यात समावेश असतो. लठ्ठपणा हीच आपली विशेष ओळख आहे आणि तीच आपल्याला एकमेवाद्वितीय बनवते, असं बोब्बीला वाटतं. आपली कंबर अधिक रुंद करून 99 इंच करणं हे तिचं स्वप्न आहे. तिच्या चाहत्यांमध्ये अनेक पुरुषांचाही समावेश आहे. काही जणांनी आपल्याला सुंदर म्हटलं, तेव्हा पहिल्यांदा आपलाच विश्वास बसला नसल्याचंही बोब्बीने सांगितलं. हे वाचा - व्हर्जिनिटी पुन्हा मिळवण्यासाठी तरुणींकडून या पद्धतीचा होतोय मोठा वापर बोब्बीला आतापर्यंत विवाहासाठीही अनेक प्रपोझल्स आली आहेत; मात्र ती विवाहित आहे. ती म्हणते, की लोकांचं खूप प्रेम तिला लाभतं. काही जण ट्रोलही करतात; मात्र आपण त्याकडे अजिबात लक्ष देत नसल्याचंही ती सांगते. आपल्याला ट्रोलिंगमुळे अजिबात फरक पडत नसल्याचं ती म्हणते. उलट आणखी लठ्ठ होण्याची तिची इच्छा आहे. तिचं वजन असंच वाढत राहिलं, तर तिचा जीवही जाऊ शकतो, असा इशारा डॉक्टर्सनी तिला दिला आहे; मात्र ती त्याकडे लक्ष देत नाही. तिचं उद्दिष्ट जागतिक विक्रम करण्याचं आहे. त्यासाठी कार्बोहायड्रेट्स (Carbohydrates) जास्त प्रमाणात असलेला आहार ती घेते. जंक फूडही (Junk Food) ती मोठ्या प्रमाणावर खाते आणि तिचा एकंदर आहारच अनहेल्दी (Unhealthy Diet) आहे. हेल्दी खाण्याची गरज आहे, याची कल्पना असूनही आपण तसं करू शकत नसल्याचं ती सांगते.
    First published:

    Tags: Viral post, World news

    पुढील बातम्या