मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Winter Health Tips : हिवाळ्यात गरोदर महिलांनी नक्की खा हे पदार्थ, बाळाच्या वाढीसाठी असतात आवश्यक

Winter Health Tips : हिवाळ्यात गरोदर महिलांनी नक्की खा हे पदार्थ, बाळाच्या वाढीसाठी असतात आवश्यक

गर्भवती महिलांसाठी, केवळ निरोगी गर्भधारणेसाठीच नव्हे तर संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आईला आरामदायी राहण्यासाठी पोषण आहार घेणे आवश्यक असते. या काळात स्त्रीच्या शरीरात अनेक बदल घडतात.

गर्भवती महिलांसाठी, केवळ निरोगी गर्भधारणेसाठीच नव्हे तर संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आईला आरामदायी राहण्यासाठी पोषण आहार घेणे आवश्यक असते. या काळात स्त्रीच्या शरीरात अनेक बदल घडतात.

गर्भवती महिलांसाठी, केवळ निरोगी गर्भधारणेसाठीच नव्हे तर संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आईला आरामदायी राहण्यासाठी पोषण आहार घेणे आवश्यक असते. या काळात स्त्रीच्या शरीरात अनेक बदल घडतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 20 नोव्हेंबर : निरोगी जीवनासाठी पोषण खूप महत्वाचे आहे. गर्भवती महिलांसाठी, केवळ निरोगी गर्भधारणेसाठीच नव्हे तर संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आईला आरामदायी राहण्यासाठी पोषण आहार घेणे आवश्यक असते. या काळात स्त्रीच्या शरीरात अनेक बदल घडतात. शारीरिक बदलांसह हार्मोनल बदल स्त्रीच्या शरीरावर परिणाम करू शकतात. गर्भ हा शरीरातील परजीवीसारखा असतो. गर्भ त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आईच्या शरीरातील सर्व पोषक तत्वे घेत असतो.

त्यामुळे केवळ गर्भधारणेदरम्यानच नव्हे ते प्रसूतीनंतरही बाळाची काळजी घेण्यासाठी पौष्टिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक असते. आणि त्यासाठी तुम्ही गरोदरपणात चांगला आहार घेणे महत्त्वाचे आहे. गरोदरपणात कॅल्शियम, लोह, प्रोटीन, व्हिटॅमिन आणि मिनरल्स हे घटक खूप महत्वाचे असतात. आहार आणि सूर्यप्रकाशाद्वारे पुरेसे व्हिटॅमिन डी शरीराला मिळणेदेखील आवश्यक आहे. त्याचबरोबर काही पदार्थ आहेत जे तुम्ही हिवाळ्यात खाऊ शकता. याचा तुम्हाला आणि तुमच्या बाळाला नक्कीच फायदा होईल.

Mushroom In Pregnancy : प्रेग्नन्सीमध्ये मशरूम खाणं सुरक्षित आहे का? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

दही : गरोदर महिलांना संपूर्ण कॅल्शियमयुक्त आहाराची गरज असते. कारण या कॅल्शियमचा वापर गर्भाच्या शरीराची वाढ आणि विकास करण्यासाठी होत असतो. दह्यामध्ये कॅल्शियम भरपूर असते आणि हाडे मजबूत करण्याचा उत्तम उपाय आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या डेअरी उत्पादनातील चांगले बॅक्टेरिया पोटाच्या समस्या आणि यीस्ट इन्फेक्शनला प्रतिबंध करतात. मात्र दही डॉक्टरांच्या सल्ल्याने खावे आणि संध्याकाळी ५ नंतर शक्यतो दही खाऊ नये.

अंडी : प्रोटीनचा उत्कृष्ट स्रोत असतात. प्रोटीनव्यतिरिक्त अंड्यांमध्ये कोलीन, ल्युटीन, जीवनसत्त्वे बी12 आणि डी, रिबोफ्लेविन आणि फोलेटदेखील असतात, जे बाळाच्या हाडे आणि स्नायूंच्या विकासास मदत करते.

हळद : अर्धा इंच किंवा चिमूटभर कच्ची हळद पाण्यात उकळून घेतल्यास शरीरदुखीपासून आराम मिळतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. हळद अविश्वसनीय आरोग्य फायद्यांसाठी ओळखली जाते आणि म्हणून हळदीला सुपरफूड मानले जाते.

मासे : सॅल्मन, ट्यूना, मॅकेरल आणि हेरिंग सारख्या फिश ओमेगा -3 फॅटी ऍसिड, डीएचए आणि ईपीएचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत, जे जळजळ कमी करण्यास आणि विशिष्ट रोगप्रतिकारक पेशी सक्रिय करण्यात मदत करतात. मासे हे झिंक, सेलेनियमचे नैसर्गिक स्रोत आहेत आणि व्हिटॅमिन डीच्या काही नैसर्गिक अन्न स्रोतांपैकी एक आहेत.

नट्स : अक्रोड, बदाम, काजू आणि खजूर वनस्पती फायबर, नैसर्गिक शर्करा, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी परिपूर्ण असतात. शिवाय त्यात फोलेट, पोटॅशियम आणि लोहासारखे अनेक आवश्यक पोषक घटक असतात. मात्र ड्राय फ्रूटचे सेवन मर्यादेतच करावे.

रताळे : रताळ्यामध्ये बीटा-कॅरोटीन नावाचे वनस्पती संयुग असते, जे आपले शरीर व्हिटॅमिन ए तयार करण्यासाठी वापरतात. गर्भवती महिलांसाठी व्हिटॅमिन ए महत्वाचे आहे. कारण ते पेशी आणि ऊतींना मदत करते, ज्यामुळे गर्भाच्या ऊतींचा योग्य विकास होतो. रताळे हे व्हिटॅमिन ए चे उत्पादन वाढवण्याचा उत्तम मार्ग आहेत.

गूळ : गूळ हे हिवाळ्यातील सुपरफूड आहे. उसाचा रस लोखंडाच्या डब्यात गरम केल्याने त्यात लोहाचे प्रमाण जास्त असते. जेव्हा तुम्हाला साखर खाण्याची तीव्र इच्छा होते. तेव्हा गूळ किंवा गूळ-आधारित मिठाई तुम्ही खाऊ शकता. मात्र तेही नियंत्रित प्रमाणातच.

हिरव्या भाज्या : ब्रोकोली, मेथी आणि पालक यासह हिरव्या भाज्या हिवाळ्यात ताज्या मिळतात. हिरव्या भाज्यांमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, लोह, फोलेट आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. बीन्स, लिंबूवर्गीय फळे, हिरव्या भाज्यांमध्ये विशिष्ट जीवनसत्त्वे असतात. हे मेंदू आणि पाठीच्या कण्यातील जन्मजात दोषांचा धोका देखील कमी करते.

कडधान्ये आणि बीन्स : कडधान्ये आणि बीन्स हे प्रोटीन, फायबर, मिनरल्स, लोह आणि फायटोकेमिकल्सचे चांगले स्रोत आहेत. सोयाबीन, मसूर, हिरव्या भाज्या, मटार आणि शेंगदाणे यांचे सेवन बाळासाठी चांगल्या दर्जाचे दूध तयार करण्यासाठी केले पाहिजे.

बेरी : बेरी हे व्हिटॅमिन सी चा एक चांगला स्रोत आहे. यामध्ये आवश्यक जीवनसत्व, अँटिऑक्सिडेंट असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात आणि हिवाळ्याच्या सर्दीदरम्यान सामान्य असलेल्या श्वसन संक्रमणांशी लढण्यास मदत करतात. बेरीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आणि विरोधी दाहक आणि अँटीव्हायरल प्रभाव असतो.

Pregnancy Tips : गरोदरपणात भात खावा की नाही? White की Brown कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर

फुलकोबीची पानं : फुलकोबीची पानं आपण साधारणपणे फेकून देतो. त्यामध्ये सर्व हिरव्या पालेभाज्यांपेक्षा लोह आणि फायबरचे प्रमाण सर्वाधिक असते. फुलकोबीच्या पानं उकळून खाऊ शकता किंवा सूप, डाळ इत्यादींमध्ये घालूनही खाता येते.

First published:

Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle, Pregnancy, Pregnant woman, Winter, Women