जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Winter Care : हिवाळ्यातील रुक्ष, कोरड्या त्वचेपासून मिळवा सुटका, अशाप्रकारे वापरा बदाम आणि कोरफड

Winter Care : हिवाळ्यातील रुक्ष, कोरड्या त्वचेपासून मिळवा सुटका, अशाप्रकारे वापरा बदाम आणि कोरफड

Winter Care : हिवाळ्यातील रुक्ष, कोरड्या त्वचेपासून मिळवा सुटका, अशाप्रकारे वापरा बदाम आणि कोरफड

त्वचा कोरडी होण्यामागे विविध कारणं असतात, ज्यामध्ये हवामानाची स्थिती, गरम शॉवर, रफ साबण किंवा टॉवेलने त्वचा जोरात घासणे यांचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला कोरड्या त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 30 ऑक्टोबर : हिवाळा सुरु होताच त्वचेच्या समस्या सुरु होतात. त्वचा कोरडी वाटू लागते, त्यामुळे बऱ्याचदा खाजही येते. त्वचा कोरडी होण्यामागे विविध कारणं असतात, ज्यामध्ये हवामानाची स्थिती, गरम शॉवर, रफ साबण किंवा टॉवेलने त्वचा जोरात घासणे यांचा समावेश आहे. या कोरड्या त्वचेचा आपल्याला खूप त्रास होतो. मात्र त्वचा पुन्हा हायड्रेट करण्यासाठी तुम्हाला महागडे लोशन आणि क्रीम खरेदी करण्याची गरज नाही. त्याऐवजी तुम्ही तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी घरगुती उपाय वापरू शकता. त्वचेच्या कोरडेपणामुळे आपल्या शरीरात अनेक ठिकाणी खाज सुटू लागते. काहीवेळा परिस्थिती अशी बनते की खाजवलेल्या ठिकाणी जखमा होतात किंवा संसर्ग होतो. एकाच वेळी अनेक भागांमध्ये ही खाज सुटू लागली, तर समस्या अधिकच वाढते. त्यामुळे कोरड्या त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

दात किडण्याच्या समस्येने त्रस्त आहात? ‘हे’ 4 घरगुती उपाय ठरतील उपयुक्त

बदाम कोरफडीच्या क्रीमचा असा होईल फायदा बदाम आणि कोरफड अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असतात. यातील पोषक तत्व त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करतात. ज्यामुळे त्वचेची खाजही कमी होते. बदाम आणि कोरफड त्वचा हायड्रेटेड ठेवतात. यामुळे त्वचेची मॉइश्चरायझर पातळी राखली जाते. यांच्या वापराने हिवाळ्यातही त्वचा तजेलदार आणि चमकदार राहाते. त्यामुळे बदाम आणि कोरफडीचे हे घरी तयार केले क्रीम तुमच्या त्वचेचे इरिटेशन आणि खाज कमी करू शकते.

News18लोकमत
News18लोकमत

असे बनवा बदाम कोरफडीचे क्रीम बदाम आणि कोरफडीचे हे घरगुती क्रीम बनवण्यासाठी 10 बदाम घेऊन ते रात्रभर भिजत घाला. सकाळी हे बदाम मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट बनवा. नंतर ही बदामाची पेस्ट एका भांड्यात घेऊन त्यामध्ये 2 चमचे कोरफडीचा ताजा गर घेऊन चांगले मिक्स करा. नंतर यामध्ये दोन ते तीन व्हिटॅमिन कॅप्सूल टाका. हे व्यवस्थित मिक्स झाल्यावर तुमची क्रीम तयार होते. तुम्ही ही क्रीम नियमित त्वचेवर वापरू शकता. तुम्हाला हवे असल्यास या क्रीममध्ये तुम्ही गुलाबजलही टाकू शकता. त्वचेचे हायड्रेशन टिकवून ठेवण्यासाठी इतर उपाय ऑलिव्ह ऑइल क्लिन्झर : ऑलिव्ह ऑइल हे एक नैसर्गिक तेल आहे, जे क्लीन्झर तसेच मॉइश्चरायझर म्हणून वापरले जाऊ शकते. आपल्या हातात थोडे ऑलिव्ह ऑइल त्वचेवर लावा. एक उबदार, ओलसर कापड किंवा टॉवेल घ्या आणि ते थंड होईपर्यंत चेहऱ्यावर ठेवा. जास्तीचे ऑइल नंतर कापसाने पुसून टाका. साखर आणि ऑलिव्ह स्क्रब : साखर आणि ऑलिव्ह ऑईल एकत्र करून उत्तम एक्सफोलिएटिंग स्क्रब म्हणून वापरता येऊ शकते. अर्धा कप साखर घ्या आणि त्यात 2 चमचे ऑलिव्ह ऑईल मिसळा. त्यानंतर ते त्वचेवर लावा आणि घासून स्वच्छ धुवा. तुम्हाला चांगला सुगंध हवा असल्यास तुम्ही यात लॅव्हेंडर, लेमनग्रास यासारखे इसेन्शियल ऑइल घालू शकता. हवामान बदलामुळे आजार का वाढतात? ही आहेत कारणे आणि प्रतिबंध करण्याच्या पद्धती खोबरेल तेल : खोबरेल तेल कोरड्या त्वचेसाठी देखील एक चांगले मॉइश्चरायझर आहे. झोपण्यापूर्वी ते त्वचेवर हळूवारपणे लावा. नारळ तेल वापरण्यासाठी एक परिपूर्ण मॉइश्चरायझिंग क्रीम आहे. यामुळे हात पायांची फाटलेली त्वचा बरी होण्यास मदत होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात