मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

'बायको अंघोळ करत नाही तिच्यापासून सुटका हवी', विचित्र कारण देत नवऱ्याने मागितला घटस्फोट

'बायको अंघोळ करत नाही तिच्यापासून सुटका हवी', विचित्र कारण देत नवऱ्याने मागितला घटस्फोट

बायकोच्या घाणेरड्या सवयीला वैतागला नवरा.

बायकोच्या घाणेरड्या सवयीला वैतागला नवरा.

बायकोच्या घाणेरड्या सवयीला वैतागला नवरा.

  • Published by:  Priya Lad

लखनऊ, 22 सप्टेंबर : नवरा-बायको (Husband wife) म्हटलं की त्यांच्यात प्रेमाप्रमाणे वाद  (Husband wife dispute) हे असतात. अगदी छोट्या छोट्या कारणांमुळेही त्यांच्यात भांडणं  (Husband wife fight) होतात. पण अनेकदा असेच लहानसहान वाद, भांडणं इतकी विकोपाला जातात की ती घटस्फोटापर्यंत (Divorce) पोहोचतात  (Husband wife divorce). काही कारणं तर अशी असतात की ती ऐकून आपल्याला आश्चर्यच वाटेल. सध्या घटस्फोटाचं असंच एक प्रकरण समोर आलं. ज्यात नवऱ्याने बायको अंघोळ करत नाही म्हणून घटस्फोट हवा आहे (Husband seeks divorce because wife not bathing).

उत्तर प्रदेशच्या (Uttar pradesh) अलिगडमधील (Aligarh) चंडौसमधील एका व्यक्तीने बायको अंघोळ करत नाही म्हणून घटस्फोट मागितला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार दोन वर्षांपूर्वीच या दोघांचं लग्न झालं. लग्नानंतर सुरुवातीचा काही दिवस दोघंदी गुण्यागोंविदाने नांदत होते. त्यांचा सुखी संसार सुरू होता. पण हळूहळू त्यांच्या नात्यात कटुता येऊ लागली. त्यांच्यामध्ये भांडणं होऊ लागले. दोघंही एकमेकांना ओळखू लागले. त्यांच्या सवयी समोर येऊ लागल्या आणि सवयींवरून त्यांच्यामध्ये भांडणं होऊ लागली.  त्यांना एक मुलगाही झाला पण त्यानंतरही त्यांच्यातील वाद काही संपलं नाही. त्यांच्यातील नातं मजबूत झालं नाही.

हे वाचा - बर्थ डे विसरला म्हणून बायकोने दिली अशी शिक्षा; पुरता हडबडला नवरा

पण आता बायकोच्या घाणेरड्या सवयीला वैतागलेल्या नवऱ्याला आता तिच्यापासून कायमची सुटका हवी आहे, यासाठी त्याने घटस्फोटाचा मार्ग निवडला आहे. मीडिया रिपोर्टनुसार हा नवरा महिला संरक्षण कक्षाकडे पोहोचला, मॅडम माझी बायको अंघोळ करत नाही. मी तिच्यासोबत राहू शकत नाही, कृपया मला घटस्फोट मिळवून द्या, अशी मागणी त्याने केली.

तिथल्या समुपदेशकांनी त्या दोघांचीही बाजू ऐकून घेतली. त्यांच्यातील वाद मिटवून त्यांचं नातं सुधारता येतं का, घटस्फोटापासून त्यांना परावृत्त करता येतं का यासाठी प्रयत्न केले.

हे वाचा - Explainer: परस्परसहमतीने घटस्फोट म्हणजे काय? कायदा काय सांगतो?

यावेळी त्यांना घटस्फोटाचं कारण विचारण्यात आलं. नवऱ्याने दिलेलं कारण ऐकून सर्वजण हैराण झाले. 'बायको अंघोळ करत नाही तिच्या शरीरातून दुर्गंधी येते आणि तिच्यासोबत एक दिवसही राहायचं नाही', असं कारण दिलं.  तर बायकोने 'छोट्या छोट्या कारणावरून नवरा आपल्याला त्रास देतो', असा आरोप केला.

First published:

Tags: Aligarh, Divorce, Uttar pradesh, Wife and husband