• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • World Elephant Day : हत्ती दिन का साजरा केला जातो? या पद्धतीनं तुम्हीही करू शकता हत्तींचं संरक्षण

World Elephant Day : हत्ती दिन का साजरा केला जातो? या पद्धतीनं तुम्हीही करू शकता हत्तींचं संरक्षण

12 ऑगस्ट हा दिवस जागतिक हत्ती दिन (World Elephant Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी हत्तींचं संरक्षण आणि संवर्धनाबाबत (Protection and preservation of Elephants) जागृती केली जाते.

  • Share this:
नवी दिल्ली 12 ऑगस्ट : दरवर्षी 12 ऑगस्ट हा दिवस जागतिक हत्ती दिन (World Elephant Day) म्हणून साजरा केला जातो. 2012 साली याची सुरुवात करण्यात आली होती. लाखो वर्षांपासून हत्ती या पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. हत्तींच्या विविध प्रजातींपैकी आफ्रिकन फॉरेस्ट एलिफंट (African Forest Elephant), आफ्रिकन बुश एलिफंट (African Bush Elephant) आणि एशियाटिक एलिफंट (Asiatic Elephant) या तीन प्रजाती सध्या अस्तित्वात आहेत. पण दुर्दैवाने शिकारी, तस्कर यांच्यामुळे या हत्तींच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. तसंच, जंगलं कमी होत असल्यामुळे या हत्तींचा अधिवास उद्धवस्त होत आहे. म्हणूनच, हत्तींचं संरक्षण आणि संवर्धनाबाबत (Protection and preservation of Elephants) जागृती करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. हत्तींच्या संरक्षणासाठी तुम्हीदेखील मोठ्या प्रमाणात मदत करू शकता. यासाठी तुम्हाला केवळ काही गोष्टी कराव्या (How to protect elephants) लागणार आहेत. यातील पहिली गोष्ट म्हणजे, हस्तिदंतापासून (Ivory) तयार झालेल्या वस्तू घेणं टाळा. हस्तिदंतापासून बनवण्यात आलेली शिल्प, दागिने किंवा चिनी पारंपरिक औषधं अशा गोष्टींना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी कित्येक वेळा हत्तींना मारुन त्यांचे दात काढून घेण्यात येतात. त्यामुळे हत्तींना वाचवायचं असेल, तर हस्तिदंतापासून तयार झालेल्या गोष्टींची मागणी कमी करणं (Say no to Ivory) गरजेचं आहे. Business Idea: या व्यवसायासाठी मिळेल सरकारकडून सबसिडी, होईल 8 लाखांची कमाई यासोबतच वाईल्ड एलिफंट टूरिझमला (Support wild elephant tourism) पाठिंबा देऊनही तुम्ही हत्तींची मदत करू शकता. अभयारण्यांना भेट देऊन, तिथे सफारी करुन तुम्ही हत्तींना जवळून पाहू शकता. शिवाय यातून जे पैसे त्या प्रशासनाला मिळतात त्यातून ते हत्तींच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करू शकतात. अर्थात हे केवळ वाईल्ड लाईफ टूरिझमसाठी लागू होतं. प्राणी संग्रहालये किंवा इतर कॅप्टिव्ह एलिफंट टूरिझमला (Say no to captive elephant tourism) आपण विरोध करायला हवा. कारण या ठिकाणचे हत्ती हे आपल्या कळपापासून जबरदस्ती वेगळे करुन (Elephants separated from herd) आणलेले असतात. असं होणं टाळण्यासाठी आपणही तिकडे भेट देणं टाळायला हवं. 'तुम्ही सर्व गाढव आहात'; मुलाच्या नावावरून करीनाला ट्रोल करणाऱ्यांवर भडकली स्वरा बऱ्याच वेळा बक्षिसांच्या रकमेसाठी म्हणून हत्तींची शिकार केली जाते. कित्येक शिकारी आपण गावाच्या भल्यासाठी शिकार (Elephant hunting) केल्याचा कांगावा करतात. शिकाऱ्यांनी मारलेल्या हत्तींना अत्यंत वेदनादायी मरण येते. एका हत्तीच्या शिकारीमुळे त्यांच्या संपूर्ण कळपाला फटका बसतो. परिणामी त्यांची संख्या कमी होत जाते. त्यामुळे अशा प्रकारच्या शिकारीचा आपण शक्य तसा विरोध (Protest against trophy hunting) करायला हवा. यासाठी तुम्ही सोशल मीडियाचाही आधार घेऊ शकता. हत्तींच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी जगभरात कित्येक संस्था काम करतात. वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड (WWF), दी एलिफंट सोसायटी (The Elephant society), वाईल्डलाईफ एसओएस (Wildlife SOS) या त्यांपैकी काही संस्था. याप्रमाणेच तुमच्या आसपासही अशा काही संस्था असू शकतात. या संस्थांना डोनेशन देऊन तुम्ही हत्तींच्या संवर्धानामध्ये आपला खारीचा वाटा उचलू शकता. तसेच, सोशल मीडिया आणि इतर माध्यमांचा वापर करुन तुम्ही लोकांमध्ये हत्तींबाबत चर्चा (Educate others about Elephants) करु शकता. यामुळे अधिकाधिक लोकांना याबाबत माहिती मिळेल, आणि मोठ्या प्रमाणात जनजाग़ृती होऊ शकेल.
First published: