मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'तुम्ही सर्व गाढव आहात'; मुलाच्या नावावरून करीनाला ट्रोल करणाऱ्यांवर स्वरा भास्करचा निशाणा

'तुम्ही सर्व गाढव आहात'; मुलाच्या नावावरून करीनाला ट्रोल करणाऱ्यांवर स्वरा भास्करचा निशाणा

स्वरा भास्करने नुकताच सैफ आणि करीनाच्या दुसऱ्या मुलाच्या नावाबाबत आपलं मत मांडलं आहे

स्वरा भास्करने नुकताच सैफ आणि करीनाच्या दुसऱ्या मुलाच्या नावाबाबत आपलं मत मांडलं आहे

स्वरा भास्करने नुकताच सैफ आणि करीनाच्या दुसऱ्या मुलाच्या नावाबाबत आपलं मत मांडलं आहे

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 12 ऑगस्ट- अभिनेत्री करीना कपूर खानने(Kareena Kapoor Khan) काही महिन्यांपूर्वी आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतरचं सर्वांना त्याच्या नावाची उत्सुकता लागून राहिली होती. मात्र करीनाने कोणताही खुलासा केलेला नव्हता. मात्र काही दिवसांपूर्वी करीनाने आपल्या मुलाचं नाव जेह (Jeh) असं सांगितलं होतं. तसेच करीनाचं पुस्तक ‘करीना कपूर खान्स प्रेग्नेन्सी बायबल’मध्ये करीनाने आपल्या मुलाचं नाव जहांगिर (Jehangir) असं सांगितलं आहे. हे नाव समोर येताच करीना आणि सैफ पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. तैमुरप्रमाणेचं दुसऱ्या मुलाच्या नावावरूनदेखील सैफ आणि करीना ट्रोल होतं आहेत. नणंद सबानंतर आत्ता या दोघांच्या बचावामध्ये अभिनेत्री स्वरा भास्करने (Swara Bhaskar) एन्ट्री केली आहे.

स्वरा भास्करने नुकताच सैफ आणि करीनाच्या दुसऱ्या मुलाच्या नावाबाबत आपलं मत मांडलं आहे. तसेच करीनाच्या मुलाला ट्रोल करणाऱ्या युजर्सनां चांगलचं फटकारलंदेखील आहे. स्वराने ट्वीट करत म्हटलं आहे, ‘एखाद्या दाम्पत्याने आपल्या मुलाचं नाव ठेवलं आहे. मात्र ते दाम्पत्य तुम्ही नाही. तरीसुद्धा तुमचं यावर मत आहे, की त्या मुलाचं नाव काय असावं आणि का असावं. तुमच्या डोक्यात एक मुद्दा आहे. आणि त्यामुळे तुमच्या भावना दुखावत आहेत. तर तुम्ही जगातील सर्वात मोठे गाढव आहात’.

(हे वाचा: HBD Sara Ali Khan: म्हणून सारा वडील सैफ आणि करीनापासून राहते दूर)

करीना आणि सैफ आपला पहिला मुलगा तैमुरच्यावेळीसुद्धा वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. तैमुरच्या नावरूनसुद्धा खूपच वादविवाद झाले होते. त्यावेळीही लोकांना हे नाव अजिबात पसंत पडलं नव्हत. या कारणामुळे करीना आणि सैफ सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाले होते. तसेच ट्वीटरवर ट्रेंडदेखील करत होते. आत्ता पुन्हा एकदा दुसऱ्या मुलाच्या जहांगिर या नावावरून हे दोघे ट्रोल होऊ लागले आहेत.

First published:

Tags: Kareena Kapoor, Saif Ali Khan