जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Refrigerator : रेफ्रिजरेटरची क्षमता लिटरमध्ये का मोजली जाते?

Refrigerator : रेफ्रिजरेटरची क्षमता लिटरमध्ये का मोजली जाते?

refrigerator

refrigerator

रेफ्रिजरेटरची क्षमता लिटर्समध्ये का मोजतात आणि ती का महत्त्वाची असते? या प्रश्नाचं योग्य उत्तर पाहूयात.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 28 फेब्रुवारी :   जेव्हा आपण नवीन फ्रीज घ्यायचा विचार करतो, तेव्हा फ्रीज नेमका किती लिटरचा असावा असा पहिला प्रश्न आपल्या मनात येतो. जेव्हा आपण रेफ्रिजरेटर विकत घेण्यासाठी बाजारात जातो, तेव्हा कोणताही दुकानदार सर्वप्रथम रेफ्रिजरेटची क्षमता लिटरमध्ये सांगतो. रेफ्रिजरेटरची क्षमता लिटर्समध्ये का मोजतात आणि ती का महत्त्वाची असते, असा प्रश्न मनात येतो. त्याबद्दल माहिती घेऊ या. लिटर ही फ्रिजमध्ये सामान ठेवण्याची क्षमता असते. शेल्फ आणि इतर सामान काढून टाकल्यानंतर आतल्या जागेच्या मोजमापावरून ही क्षमता निश्चित केली जाते. रेफ्रिजरेटरमध्ये किती वस्तू ठेवता येऊ शकतात, हे कळण्यासाठी त्याची क्षमता लिटरमध्ये मोजली जाते. यासाठी एक गणितीय सूत्र वापरलं जातं. समजा एका क्यूबचा आकार 10cm × 10cm × 10 cm आहे. त्यात एक लिटर पाणी राहू शकतं. 200 लिटर क्षमतेच्या फ्रीजमध्ये असे 200 क्यूब्ज बसू शकतात किंवा प्रत्येकी दोन लिटरच्या 100 बाटल्याही बसू शकतात. हेही वाचा - उन्हाळ्यात थंड पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? अवश्य घ्या जाणून रेफ्रिजरेटर खरेदी करायला गेल्यावर त्याची क्षमता जाणून घ्यायची असेल तर फ्रीजच्या आतल्या बाजूला किंवा पाठीमागे एक सीरियल नंबरचं लेबल लावलेलं असतं. त्यावर फ्रीजची एकूण क्षमता नमूद केलेली असते. काही वेळा एखादा रेफ्रिजरेटर बाहेरून पाहिल्यावर त्याचं एक्स्टीरियर आणि इंटीरियर एकसारखं दिसतं; पण त्याचा व्हॉल्यूम (साठवण्याची क्षमता) वेगवेगळा असू शकतो. फ्रीजवर कोणतंही लेबल किंवा स्टिकर लावला नसेल तर त्याची क्षमता जाणून घेण्यासाठी रेफ्रिजरेटरची आतली लांबी, रुंदी आणि खोली मोजून त्याचा क्यूबिक व्हॉल्यूम काढू शकता. याशिवाय मेजरमेंट टेप वापरूनही फ्रीजची क्षमता मोजू शकता. यासाठी फ्रीज उघडून त्याची उंची, लांबी आणि रुंदी सेंटिमीटरमध्ये मोजावी. त्याला तीनने गुणून 1000 ने भागलं तर फ्रीजची अंदाजे क्षमता समजू शकेल.

    News18लोकमत
    News18लोकमत

    कोणत्या क्षमतेचा फ्रीज आपल्यासाठी योग्य राहील, या प्रश्नाचं अचूक उत्तर देता येणार नाही. कुटुंबात एक किंवा दोन सदस्य असतील तर 200 ते 380 लिटरचा फ्रीज पुरेसा ठरतो. कुटुंबात तीन ते चार सदस्य असतील तर 350 ते 530 लिटरचा फ्रीज योग्य ठरेल. कुटुंबात पाचपेक्षा जास्त सदस्य असतील तर 440 लिटरचा फ्रीज हा उत्तम पर्याय आहे. खरं तर असा कोणताही नियम नाही. बजेट आणि गरज याचा विचार करून योग्य क्षमतेचा फ्रीज खरेदी करू शकता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: lifestyle
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात