मुंबई, 28 फेब्रुवारी: उन्हाळा ऋतू सुरू झाला असून वातावरणामध्ये कमालीची उष्णता वाढली आहे. त्यामुळे सतत तहान भागवण्याची गरज निर्माण झाली आहे. आपल्यापैकी बरेच जण उन्हाळ्यात थंडगार पाणी पिण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये बाटल्या ठेवतात. पण, तुम्ही हेही ऐकलं असेल की, एकदम थंडगार पाणी पिणं आरोग्यासाठी तितकेसं फायदेशीर नसतं. विशेषतः जेव्हा हिवाळा संपून उन्हाळा सुरू होतो तेव्हा थंड पाणी आरोग्यासाठी योग्य ठरत नाही. जर तुम्हाला या उन्हाळ्यात थंडगार पाणी पिणं टाळण्याचा सल्ला देण्यात आला असेल पण, तुम्हाला त्यामागील कारण माहीत नसेल तर काळजी करू नका. त्यामागील कारणाचा खुलासा या ठिकाणी देण्यात आला आहे. थंड पाणी प्यायल्यानं तुमच्या आरोग्याला दीर्घकालीन हानी पोहोचू शकते. असं म्हटलं जातं की, थंड पाण्यानं पोट आकुंचन पावतं आणि जेवणानंतर अन्न पचणं कठीण होतं. जर आपण बर्फाच्या तपमानाच्या जवळपास तापमान असलेलं पाणी किंवा चार अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असलेलं पाणी प्यायलं तर आपल्या शरीराला अंतर्गत तापमान 37 अंश सेल्सिअस राखण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात.
हार्ड वर्कआउटसाठी वेळ मिळत नाही? रोज केवळ 30 मिनिटे हा गेम! वजन वेगाने होईल कमीअसं म्हटलं जातं की, पारंपरिक चिनी वैद्यकशास्त्रानुसार, गरम जेवणासोबत थंड पाणी प्यायल्यास पचन क्रियेत असंतुलन निर्माण होतं. त्यामुळे चिनी संस्कृतीत जेवणासोबत गरम पाणी किंवा गरम चहा दिला जातो. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननं प्रकाशित केलेल्या 2012 मधील एका अभ्यासानुसार, जेव्हा जेवणाबरोबर थंड पाणी प्यायलं जातं तेव्हा एकलेशिया नावाच्या वैद्यकीय स्थितीशी संबंधित वेदनादेखील तीव्र होऊ शकतात. एकलेशिया ही समस्या अन्ननलिकेतून अन्न पास करण्याची शरीराची क्षमता मर्यादित करते. या शिवाय, तुम्हाला सर्दी, फ्लू असताना किंवा एखादा जुनाट आजार असताना थंड पाणी प्यायल्यास पचन मंद होत असेल तर तुमच्या आरोग्याची स्थिती आणखी बिघडू शकते.
Weight Loss Tips : झटपट वजन कमी करायचंय? रोज यावेळी घ्या ‘या’ हिरव्या पानांचा काढाकाही विशिष्ट परिस्थितीत थंड पाण्याचे काही फायदेदेखील आहेत. असं म्हणतात की, व्यायामादरम्यान थंड पाणी प्यायल्यानं तुमचं शरीर जास्त गरम होण्यापासून वाचू शकतं आणि तुमचे वर्कआउट सत्र अधिक प्रभावी बनतं. वर्कआउट करताना थंड पाणी प्यायल्यानं तुमच्या शरीरासाठी अंतर्गत तापमान कमी राखणं सोपे होतं. कोमट किंवा गरम पाणी प्यायल्यानं तुम्हाला तहान कमी लागते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे धोकादायक ठरू शकतं. कारण, उन्हाळ्यात तुमचं शरीर घामाच्या माध्यमातून उष्णता बाहेर फेकून शरीराचं अंतर्गत तापमान कमी ठेवण्याचा प्रयत्न करत असतं. त्यामुळे, असा सल्ला दिला जातो की, आपण आरोग्याच्या कोणत्याही समस्या टाळण्यासाठी सामान्य तापमान असलेलं पाणी प्यायलं पाहिजे.

)







