मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

मुंबईत आढळलेल्या भारतातील पहिल्या XE Variant Patient काय आहे अवस्था?

मुंबईत आढळलेल्या भारतातील पहिल्या XE Variant Patient काय आहे अवस्था?

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

India's first Corona XE Variant case in Mumbai : भारतात आढळलेल्या XE व्हेरिएंट रुग्णामध्ये काय लक्षणं आहेत आणि त्याच्यावर या व्हेरिएंटचा काय परिणाम झाला आहे याची सविस्तर माहिती.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 06 एप्रिल : भारतात कोरोनाच्या एक्सई व्हेरिएंटचा पहिला रुग्ण मुंबईत आढळला आहे (XE variant in India). त्यामुळे आता सरकारचीही चिंता वाढली आहे (XE variant in Mumbai). कारण जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार XE हा ओमिक्रॉनच्या ओमिक्रॉनच्या BA.2  पेक्षा 10 टक्के जास्त संसर्गजन्य आहे. अशाच स्ट्रेनची लागण झालेला देशातील या पहिल्या रुग्णाबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे (India's First XE variant patient in Mumbai).

मुंबईत 230 कोरोना रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला. यात ओमायक्रॉनचे 228 अर्थात 99.13 टक्के रुग्ण आढळले आहेत. उरलेल्या दोन बाधितांपैकी एक जण कापा उपप्रकाराने तर अन्य एक जण एक्सई उपप्रकाराने बाधित असल्याचं निष्पन्न झालं आहे.

मुंबईत आढळलेला XE Variant रुग्ण ही 50 वर्षांची महिला आहे. जी दक्षिण आफ्रिकेतील नागरिक आहे. 10 फेब्रुवारीला ही महिला दक्षिण आफ्रिकेहून भारतात आली.

हे वाचा - Alert! कोरोनापेक्षाही महाभयंकर Zombie Virus पसरतोय; खरंच प्रत्यक्षात माणसं झॉम्बी बनणार?

या महिलेने कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तिच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं नाही आहेत.

जेव्हा ती भारतात आली तेव्हा गाइडलाइन्सनुसार तिची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यावेळी तिचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह होता. पण 2 मार्चला नियमित चाचणीत मात्र तिचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तिला हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. 3 मार्चला तिची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली. तेव्हा तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.

हे वाचा - कसं शक्य आहे! किडनी इन्फेक्शनवर उपचार करायला गेली महिला आणि अचानक जन्माला आलं बाळ

XE हा ओमिक्रॉनचे (Omicron) सबव्हेरिएंट  BA.1 आणि BA.2 या प्रकारातून बनलेला आहे. म्हणजे तो recombinant आहे. 19 जानेवारी रोजी सर्वात आधी यूकेमध्ये हा व्हेरिएंट आढळला. WHO च्या प्राथमिक अंदाजानुसार, XE हा ओमिक्रॉनच्या BA.2  पेक्षा 10 टक्के जास्त संसर्गजन्य आहे. मात्र, या दाव्याविषयी आणखी संशोधन होण्याची आवश्यकता आहे, असंही WHO ने म्हटले आहे.

First published:

Tags: Coronavirus