Home /News /lifestyle /

आंबा-स्ट्रॉबेरीप्रमाणे का बनवलं जात नाही द्राक्षांचं Ice Cream? तुम्ही कधी खाल्लं आहे का?

आंबा-स्ट्रॉबेरीप्रमाणे का बनवलं जात नाही द्राक्षांचं Ice Cream? तुम्ही कधी खाल्लं आहे का?

सध्या बाजारात अनेक वेगवेगळ्या फ्लेवर्सची आईस्क्रीम्स उपलब्ध असतात. दुकानात गेल्यानंतर तुम्ही अनेकदा कोणत्या फ्लेवर्सचे आईस्क्रीम हवे, हे दुकानदारांना सांगितले असेल. पण तुम्ही कधी द्राक्षापासून बनवलेले आईस्क्रीम पाहिले आहे का?

मुंबई, 22 जानेवारी: सध्या बाजारात अनेक वेगवेगळ्या फ्लेवर्सची आईस्क्रीम्स उपलब्ध असतात. दुकानात गेल्यानंतर तुम्ही अनेकदा कोणत्या फ्लेवर्सचे आईस्क्रीम हवे, हे दुकानदारांना सांगितले असेल. पण तुम्ही कधी द्राक्षापासून बनवलेले आईस्क्रीम पाहिले आहे का? पाहणे तर सोडाच, पण कधी त्याबद्दल ऐकलं तरी आहे का? या प्रश्नाचे बहुतांश जणांचे उत्तर 'नाही' असेच असेल. कारण द्राक्षापासून आईस्क्रीम सहसा तयार करत नाहीत. आंबा, स्ट्रॉबेरी आणि अननस यांसारख्या फळांची चव असलेली आईस्क्रीम तुम्ही खूप खाल्ली असतील, पण द्राक्षाच्या चवीचं आईस्क्रीम का मिळत नाही, याचा कधी विचार केला आहे? जगभर आईस्क्रीमबाबत इतके प्रयोग होत असताना द्राक्षाच्या चवीचं आइस्क्रीम का मिळत नाही ? असा प्रश्न पडतो. मात्र, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, द्राक्षाचे आईस्क्रीम बनवणं अशक्य आहे असं नाही, पण परफेक्ट आईस्क्रीम बनवणं अवघड आहे. त्यामुळे ते सहसा मिळत नाही. रीडर्स डायजेस्टच्या रिपोर्टमध्ये, फूड प्रोफेशनल जिम ममफोर्ड (Jim Mumford ) यांनी याची अनेक कारणं दिली आहेत. रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की, अनेक वेळा लोकांनी द्राक्षाच्या फ्लेवरचं आईस्क्रीम बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना त्यात यश मिळालं नाही. असं आईस्क्रीम का तयार करता आलं नाही, याबाबतची कारणं जिम ममफोर्ड यांनी सांगितली आहेत. हे वाचा-दररोज 3 ते 4 कप कॉफी घेता?, मग ही बातमी खास तुमच्यासाठी म्हणून बनत नाही द्राक्षाचं आईस्क्रीम - द्राक्षांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे. द्राक्ष खाल्याने शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होते, परंतु ही गुणवत्ता आईस्क्रीम बनवण्यासाठी योग्य नाही. जेव्हा तुम्हाला द्राक्षाचे आईस्क्रीम बनवायचे असते, तेव्हा त्यातील पाण्याचा बर्फ तयार होतो. असे बर्फाचे तुकडे असणारे आईस्क्रीम खाण्यामध्ये अनेकांना आनंद मिळत नाही. त्यामुळे ते बनवले जात नाही. - द्राक्षाचे आईस्क्रीम न बनवण्यामागचे दुसरे सर्वात मोठे कारण म्हणजे या फळात आढळणारे अॅसिड. जेव्हा ते दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांमध्ये मिसळले जाते, तेव्हा रासायनिक प्रक्रिया होऊ शकते. त्यामुळे, जरी तुम्हाला द्राक्षे दुधात किंवा इतर दुग्धजन्य पदार्थात मिसळायची असतील, तर द्राक्षातील अॅसिड अगोदर काढावे लागेल. - द्राक्षांमध्ये अँथोसायनिन कम्पाउंड आढळतं. हे एक पॉवरफुल अँटिऑक्सिडेंट आहे. द्राक्षं गोठल्यावर यामध्ये बदल होतात. आईस्क्रीममध्ये द्राक्षे वापरल्यास त्याचा रंग आणि चव बदलते. यामुळेच द्राक्षांपासून बनवलेल्या बहुतेक थंड पदार्थांना रंग यावा, यासाठी कृत्रिम रंगांचा वापर केला जातो. हे वाचा-अंड्यासह खाताय हे पदार्थ? विविध आजारांना द्याल निमंत्रण, वेळीच घ्या काळजी दरम्यान, रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, अनेक वेळा सोशल मीडियावर एक बातमी व्हायरलही होते, ज्यामध्ये असं म्हटलं जातं की अन्न औषध नियंत्रकाने द्राक्ष वापरून आईस्क्रीम बनवण्यावर बंदी घातली आहे. कारण ते खाल्ल्याने कुत्री मरतात. पण यासंबंधी कोणत्याही गाइडलाइन जारी करण्यात आलेल्या नाहीत. लहानांपासून अगदी थोरामोठ्यांपर्यंत सर्वांना आईस्क्रीम खाण्यास आवडते. आतापर्यंत तुम्ही विविध फ्लेवरचे आईस्क्रीम खाल्ले असेलच. पण हा रिपोर्ट पाहता द्राक्षाच्या फ्लेवरचं आईस्क्रीम खाणं सध्या तरी शक्य नसल्याचं दिसतंय.
First published:

Tags: Diwali Food

पुढील बातम्या