मुंबई, 21 जानेवारी: ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’ हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. आरोग्यासाठी अंडं (eggs benefits) अत्यंत लाभदायक मानलं जातं. अनेकजण चांगल्या आरोग्यासाठी दररोजच्या आहारात अंड्यांचा समावेश करतात. काही जणांचा तर अंडी हा सर्वांत आवडता पदार्थ असतो; मात्र अंडी खाताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. नाही तर आरोग्य धोक्यात येऊ शकतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अशा अनेक गोष्टी आहेत, की ज्यांचं अंड्यांसोबत सेवन (Food Avoid With Eggs) करू नये. कारण, त्यामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. त्या गोष्टी कोणत्या हे जाणून घेऊ या. व्यायाम करणाऱ्या व्यक्तींचा अंडी हा सर्वांत आवडता पदार्थ असतो. या व्यक्ती केळी आणि अंडी दोन्ही गोष्टींचा आपल्या आहारात समावेश करतात; पण अंडी खाल्यानंतर लगेचच केळी खाणं धोकादायक आहे. कारण, यामुळे शरीरात गॅस तयार होतो. तसंच आतड्यांसंबंधीच्या समस्यांनाही सामोरं जावं लागू शकतं. आंबट पदार्थ- अंडी उकडल्यानंतर अनेकांना त्यात लिंबू, चाट मसाला, आमचूर अशा गोष्टी घालून खावंसं वाटतं. यामुळे अंड्याची चव नक्कीच वाढते; पण असं करणं आरोग्यासाठी योग्य नाही. अंड्यांसोबत आंबट पदार्थ खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तसंच हृदयाशी संबंधित विविध गंभीर आजारांचा धोका वाढतो. हे वाचा- जेवणाचा प्रत्येक घास 32 वेळा चावून खायचा का? वाचा काय आहे तथ्य आणि फायदे पनीर- शरीराला प्रथिनं पुरवण्यासाठी अंडी आणि पनीर (Panner Avoid With Egg) हे दोन्ही उत्कृष्ट स्रोत आहेत. परंतु दोन्हींचं एकत्र सेवन केल्याने पचनप्रकिया बिघडू शकते. त्यामुळे लूज मोशन, गॅस आणि अॅसिडिटी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे अंडी आणि पनीर या दोन्हींचं कधीच एकत्र सेवन करू नये. मासे- उकडलेली अंडी आणि मासे या दोन्ही गोष्टींचं एकत्र सेवन करणं शरीरासाठी खूप हानिकारक ठरू शकतं. उकडलेल्या अंड्यांसोबत मासे कधीही खाऊ नयेत. कारण त्यामुळे त्वचेची अॅलर्जी होण्याची शक्यता वाढते. ही अॅलर्जी धोकादायक रूपदेखील घेऊ शकते. म्हणून दोन्ही एकत्र खाणं टाळा. हे वाचा- कोंब आलेले बटाटे खाताय तर सावधान! प्रकृतीसाठी ठरतील अत्यंत हानीकारक चहा- अंड्यांपासून बनलेल्या पदार्थांसोबत अनेकांना चहा पिण्याची सवय असते; पण अशी चूक कदापि करू नका. कारण, त्यामुळे अनेक दिवस बद्धकोष्ठता होते. पचन प्रकियेत बिघाड होऊ शकतो. तुम्हालाही अंडी खाणं आवडत असेल, तर या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. तसंच या पद्धतीने सेवन करत आला असाल आणि काही समस्या निर्माण झाल्यास तज्ज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.