मुंबई, 12 मे: हिंदू धर्मात (Hindu Religion) अशी अनेक कामं आहेत जी ठराविक वेळी किंवा ठराविक दिवशीच करावीत असं मानलं जातं. सूर्यास्तानंतर नखं (Nails) आणि केस (Hair) कापू नयेत, असं आपल्याला घरातले मोठे सांगत असतात. ज्याप्रमाणे सूर्यास्तानंतर नखं आणि केस कापण्यास मनाई आहे, त्याचप्रमाणे मंगळवार आणि गुरुवारी केस आणि नखं कापण्यास मनाई आहे. यामागे अनेक धार्मिक कारणं आहेत. गुरुवार हा भगवान विष्णूंचा (Bhagwan Vishnu) दिवस मानला जातो. अशी मान्यता आहे की या दिवशी नखं किंवा केस कापल्याने देवाचा कोप होतो. त्यामुळे घरात सुख, शांती आणि धनाची कमतरता निर्माण होते, असं मानलं जातं. मंगळवार आणि गुरुवारी नखं आणि केस कापल्यास काय होतं? या विषयावर अधिक माहितीसाठी herzindahi.com ने दिलेल्या वृत्तानुसार ही माहिती प्रख्यात पंडित, ज्योतिष, विधी, पितृदोष आणि वास्तू तज्ज्ञ प्रशांत मिश्रा यांच्या माहितीवर आधारीत आहे. ते म्हणाले, ‘मंगळवार आणि गुरुवारी केस आणि नखं कापल्याने घरात कलह निर्माण होतो. यासोबतच लहान भावाच्या किंवा मुलाच्या आरोग्यावरही (Health Issue) याचा परिणाम होतो.’ त्याच्या इतर परिणामांबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. हे वाचा- घरात ही झाडं लावण्यापूर्वीच जाणून घ्या वास्तू नियम; कंगालीचं कारण बनतील रक्ताशी संबंधित आजार मंगळवारी आणि गुरुवारी केस किंवा नखं कापल्याने रक्ताशी संबंधित आजार होऊ शकतात, असं म्हटलं जातं. कारण नखांचा ग्रहांशी संबंध असतो. मंगळवार हा मंगळ देवतेचा दिवस असून त्याचा संबंध मानवी रक्ताशी आहे. मंगळवारी ब्रह्मांडातील विविध प्रकारच्या ऊर्जा मानवी शरीरावर परिणाम करतात. अशा स्थितीत ग्रहांचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. म्हणून मंगळवारी नखं कापू नयेत असं म्हणतात. आर्थिक स्थिती मंगळवारी आणि गुरुवारी केस कापल्यास भगवान बृहस्पति म्हणजे गुरू क्रोधित होतात. त्यामुळे माणसाला अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. घरात सुख-शांतीचा अभाव होतो. तज्ज्ञांच्या मते, गुरूचा थेट संबंध आपल्या बुद्धिमत्तेशी आहे. अशा स्थितीत या दिवशी नखं आणि केस कापल्याने व्यक्तीची बुद्धी कमकुवत होते. हे वाचा- या राशींवर शनीची साडेसाती झालेली आहे सुरू; त्रास होतील, जपून करा व्यवहार गरिबी मंगळवार आणि गुरुवारी केस आणि नखं कापल्याने घरात दारिद्र्य येतं, असं म्हणतात. घरात जीवनावश्यक वस्तूंचा अभाव होतो, तसंच पैशांची कमतरता भासते. याशिवाय तन, मन आणि धन या तिन्हींबाबतीत त्रास होऊ शकतो, त्यामुळे मंगळवार, गुरुवार केस आणि नखं कापण्यास मनाई करण्यात येते. परंतु, आपण त्यातून मुक्त होऊ शकता. जाणून घेऊयात गरिबीतून मुक्त होण्याचे उपाय. गरिबी दूर करण्याचे उपाय शास्त्रानुसार मंगळवारी मंदिरात बसून हनुमानाच्या स्तोत्रांचा पाठ करा. यामुळे जीवनातील सर्व प्रकारची संकटं दूर होतील. मंगळवार व्यतिरिक्त तुम्ही शनिवारी हनुमानाच्या स्तोत्रांचा पाठ करू शकता. कलह मंगळवारी आणि गुरुवारी केस, नखं कापल्यास घरात कलह निर्माण होतो आणि ज्या घरात कलह असतो त्या घरात लक्ष्मी वास करत नाही, असं म्हटलं जातं. त्यामुळे मंगळवार आणि गुरुवारी नखं आणि केस कापण्यास मनाई आहे. कलह दूर करण्याचे उपाय घरातील कलह दूर करण्यासाठी मंगळवारी हनुमानजींसमोर पंचमुखी दिवा लावा आणि अष्टगंधाचा सुगंध घरात पसरवा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल, घरातील कलह दूर होईल तसंच सुख-शांती नांदेल. मंगळवार, गुरुवारी नखं आणि केस कापल्याने गुरूची ताकद कमी होते, त्यामुळे धनाची कमतरता भासते. म्हणून आठवड्यातील या दोन दिवशी केस आणि नखं कापू नयेत, असं म्हटलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.