मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Google वर सगळ्यात जास्त कुठली रेसिपी सर्च झाली माहितीये? मराठमोळ्या पदार्थाने केलं पनीर, पिझ्झाला धोबीपछाड

Google वर सगळ्यात जास्त कुठली रेसिपी सर्च झाली माहितीये? मराठमोळ्या पदार्थाने केलं पनीर, पिझ्झाला धोबीपछाड

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

गुगलने 2022 सर्वाधिक सर्च केलेल्या रेसिपींची ट्रेंड लिस्ट शेअर केली आहे. यामध्ये देशभरातील खवय्यांनी काय सर्च केलं ते आपण पाहु शकतो. काही आधुनिक रेसिपींबरोबच साध्या मराठी रेसिपीही सर्वाधिक बघितल्या गेल्याचे या लिस्टवरून दिसत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 08 डिसेंबर : वर्ष 2022 चा हा अखेरचा महिना सुरू आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात वर्षभर घडलेल्या घटनांचा आढावा घेतला जातो. वर्षभरात कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या, काय जास्त चाललं, गुगलवर काय ट्रेंडिग राहिलं याचा आढावा गुगलकडूनही घेतला जातो. आपल्याकडे देशभरात खवय्यांची कमी नाही, विविध पदार्थ बनवण्यासाठी आता थेट गुगल, युट्यूबची मदत घेतली जाते. कोणता नवा पदार्थ कसा बनवावा, यासाठी त्याची रेसिपी गुगलवर सर्च केली जाते.

यावेळी गुगलने सर्वाधिक सर्च केलेल्या रेसिपींची ट्रेंड लिस्टही शेअर केली आहे. यामध्ये देशभरातील खवय्यांनी काय सर्च केलं ते आपण पाहु शकतो. काही आधुनिक रेसिपींबरोबच साध्या मराठी रेसिपीही सर्वाधिक बघितल्या गेल्याचे या लिस्टवरून दिसत आहे. अलिकडे घरोघरी महिला असो पुरुष नवीन रेसिपी करण्यासाठी युट्यूबची मदत घेतात. कोणताही वेगळा पदार्थ करणे असो की आपला नेहमीचा पारंपरिक पदार्थ, तो अधिक चांगला तयार होण्यासाठी आणि सर्वांना आवडावा यासाठी कित्येक जण गुगलवर सर्च करत असतात. गुगलने 2022 मध्ये सर्च झालेल्या टॉप 10 रेसिपींची यादी शेअर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रीय पदार्थ वरच्या क्रमांकावर झळकत आहे. हा पदार्थ महाराष्ट्रात सणासुदीला घरा-घरात आवडीनं खाल्ला जातो. मात्र, आता या पदार्थाची क्रेझ संपूर्ण देशात असल्याची माहिती या ट्रेंडवरून कळत आहे.

2022 मध्ये भारतात सर्वाधिक सर्च झालेल्या रेसिपीमध्ये मोदकाचा क्रमांक दुसरा आहे. मोदक रेसिपी गुगलवर भरपूर लोकांनी पाहिल्याचे गुगलचे म्हणणे आहे. मोदक हा विशेषत: गणेश उत्सवामध्ये केला जाणारा पदार्थ आहे. उकडीच्या मोदकांना त्या काळात मोठी मागणी असते. गणेशोत्सव जसा महाराष्ट्राबाहेरही प्रसिद्ध आहे. त्याप्रमाणेच मोदकांची क्रेझही वाढल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर दिवाळीला आपल्याकडे तयार केल्या जाणाऱ्या अनारसे पदार्थही ट्रेंडिग लिस्टमध्ये आहे. खाली 2022 मध्ये भारतात सर्वाधिक सर्च झालेल्या रेसिपींची यादी पाहु शकता.

हे वाचा - Modak Recipe : यंदाचा गणेशोत्सव या 5 प्रकारच्या मोदकांनी बनवा आणखी खास, पहा रेसिपी

भारतातील 2022 मधील ट्रेंडिग रेसिपी -

1) पनीर पसंदा (Paneer Pasanda)

2) Modak

3) Sex on the beach

4) Chicken soup

5) मलाई कोफ्ते (Malai Kofta)

6) Pornstar martini

7) Pizza Margherita

8) Pancake

9) पनीर भुर्जी (Paneer Burji)

10)Anarse

First published:

Tags: Recipie, Top trending