Home /News /maharashtra /

Pune : अपंग 'कोच'च्या जिद्दीला सलाम! दोन्ही पाय गमावले; तरीही एक पैसा न घेता घडवलेत शेकडो खेळाडू, पहा VIDEO

Pune : अपंग 'कोच'च्या जिद्दीला सलाम! दोन्ही पाय गमावले; तरीही एक पैसा न घेता घडवलेत शेकडो खेळाडू, पहा VIDEO

सागर

सागर खळदकर, अपंग कोच, पुणे.

पुण्याचे राष्ट्रीय कब्बडीपटू सागर खळदकर यांचे भीषण अपघातात पाय निकामी झाले. पण, त्यांनी हार न मानता झोपडपट्टीतील शेकडो मुलांना मोफत क्रिकेट, कब्बडी आणि बास्केटबाॅलचे प्रशिक्षण दिले. आता त्यांचे विद्यार्थी अनेक स्पर्धांचे विजेते ठरत आहेत.

पुढे वाचा ...
    पुणे, 17 जून : एखादा खेळ (Sports) माणसाच्या आयुष्यात खूप काही बदल घडवून आणू शकतो. त्यासाठी तो खेळ सर्वस्व असतो. त्याचं अस्तित्व खेळावरच टिकून असतं. त्याला जिंकण्याची किंवा हारण्याची पर्वा नसते. त्याला फक्त खेळ हवा असतो. अशा खेळाडूंच्या आयुष्यात कितीही आव्हानं आली, तरी ते त्यावर मात करतात आणि आपल्या खेळाची ओढ आणि तळमळ टिकवून ठेवतात. आज आपण अशाच एका जिद्दी खेळाडूबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने अपंगत्व (Handicapped coach in Pune) आलं तरी, खेळाबद्दल तळमळ जपून ठेवली आहे. त्यातून नवे खेळाडू घडवत आहे. चला तर आपण त्या खेळाडूशी गप्पा मारू. वाचा : Success Story : स्पर्धा परीक्षा सोडली! आता ‘हा’ पठ्ठ्या हाॅटेल व्यवसायात कमवतो महिना 80 हजार, पहा VIDEO या खेळाडूचं नाव आहे सागर खळदकर (Coach Sagar Khaldakar). सागर हे राष्ट्रीय पातळीवरील कब्बडीपटू होते. 2013 साली एका भीषण अपघातात दोन्ही पाय कायमचेच निकामी झाले. त्यांना कायमचं अपंगत्व आलं. त्यांनी 7 महिने उपचार घेतले आणि दोन्ही पाय काम करत नसताना पुन्हा जिद्दीने उभे राहिले. आता ते खेळू शकत नाहीत. पण, कब्बडी, बास्केटबाॅल आणि क्रिकेटपटू घडविण्याचं काम करताहेत. त्यांनी कोथरूड येथे अभिजीतदादा क्रीडा प्रतिष्ठान स्थापन करून झोपडपट्टीतील मुलांना मोफत खेळाचे धडे देत आहेत. झोपडपट्टीतील गरीब खेळाडूंकडून प्रेरणा मिळते सागर सांगतात की, "आज मी जर थांबलो तर माझे 250-300 खेळाडू थांबतील. जर मी माझ्या अपंगत्वामुळे प्रशिक्षण देणे थांबवले, तर या गरजू खेळाडूंनी कुणाकडे पाहायचं? माझ्या विद्यार्थ्यांना खेळाची आवड आहे शिकण्याची जिद्द आहे, ते पाहून मला ऊर्जा मिळते. मला माझ्या अपंगत्वावर मात करण्याचा हुरूपदेखील या माझ्या विद्यार्थ्यांकडूनच प्रेरणा मिळते. सध्या मी वॉटर थेरपी घेतोय. काही प्रमाणात माझ्या अपंगत्वावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, माझी आहे की, ही खरी ऊर्जा माझ्या गरीब  विद्यार्थ्यांकडून मिळत आहे. त्यांना चांगल्या प्रशिक्षणाची गरज आहे, ते प्रशिक्षण देण्याचं काम माझ्याकडून कायमच चालू राहील." वाचा : Mumbai : आईच्या जिद्दीला सलाम! 25 वर्षांच्या गॅपनंतर आई 12 वी पास झाली, लेकरांच्या डोळ्यांत भरलं पाणी, पहा VIDEO अपंग कोचने घडवले राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू सागर खळदकर अनेक वर्षांपासून गरजू खेळाडूंना खेळांचे मोफत प्रशिक्षण देत आहे. सध्या त्यांच्याकडे 250 मुलं प्रशिक्षण घेत आहेत. त्यांचे 12 खेळाडू राष्ट्रीयस्तरावर खेळत आहेत. 15 खेळाडू विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून खेळत आहेत. तर 8 खेळाडू पोलीस खात्यात कार्यरत आहे. शिवाय 2 खेळाडूंनी MPSC परीक्षा देऊन PSI पदावर कार्यरत आहेत. तसेच त्यांचे 2 विद्यार्थी स्पोर्ट कोट्यातून आर्मीमध्ये भरती झालेले आहेत. सागर खळदकरांशी 9766355553 मोबाईल नंबरवर संपर्क करू शकता. तसेच भारती विद्यापीठ विद्यापीठ, शैक्षणिक संकुल रामबाग कॉलनी, कोथरूड, पौड रोड, एरंडवणे, पुणे, महाराष्ट्र 411038 असा त्यांचा पत्ता आहे.
    First published:

    Tags: Coach, Pune, Sports, महाराष्ट्र

    पुढील बातम्या