मुंबई 28 नोव्हेंबर : कोणतंही नातं मजबूत करण्यासाठी सर्वात आधी त्यात प्रेम असायला हवं. लग्न करताना नवरा-बायको एकमेकांवर खूप प्रेम करण्याची आणि एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतात आणि तसा प्रयत्न देखील करतात. पण असं असलं तरी देखील बऱ्याचदा अशा काही गोष्टी घडतात, ज्यामुळे लोक लग्न झालं असलं तरी देखील दुसऱ्या पर्यायांकडे वळतात. म्हणजेच दुसरा जोडीदार शोधतात किंवा नकळत त्याच्या प्रेमात पडतात.
बहुतेक लोकांच्या मनात अनेकदा नसलं तरी देखील असे काही प्रसंग देखील उद्भवतात, जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल आपूलकी वाटू लागते. आजच्या काळात महिला किंवा पुरुष तासनतास कामात घराबाहेर असतात. अशावेळी त्यांच्यासोबत काम करणारा त्यांचा सहकारी त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवतो. ज्यामुळे त्या व्यक्तीकडे आकर्षित होऊन अनेक लोक विवाह बाह्य संबंध ठेवतात.
पण यामागे आणखी देखील कारणं असू शकतात. यासाठी तुम्ही हा अर्टीकल नक्की वाचा
विवाहित लोक विवाहबाह्य संबंधांत का अडकतात? ही आहेत ३ मोठी कारणं
समजा जर जोरीदार एखाद्याच्या तिसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडलाच असेल किंवा त्याचे विवाह बाह्य संबंध असतील, तर ते ओळखायचे कसे? असा प्रश्न अनेकांना पडतो. तर याबद्दल काही मार्ग समोर आले आहेत. काही अनुभवी किंवा एक्पर्ट्स लोकांनी याबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. चला ते सविस्तर पाहू
1- स्वतःकडे अधिक लक्ष देणे
जेव्हा पुरुष किंवा महिला प्रेमात असते किंवा एखाद्या नात्याची सुरुवात असते, तेव्हा ती व्यक्ती स्वतःकडे खूप लक्ष देते. त्याचं व्यक्तिमत्त्व आकर्षक करण्याचा प्रयत्न करते. जर तुमचा नवरा किंवा बायको देखील हे करत असेल तर त्यांच्या आयुष्यात कुणीतरी प्रवेश केल्याचं हे लक्षण असू शकतं.
2- तुमची तुलना करणे
जर तुमचा नवरा तुमची तुलना दुसऱ्या महिलेशी करत असेल, किंवा या उलट बायको तसं करु पाहात असेल, तर समजून घ्या की त्याला आता तुमच्यात उणिवा दिसू लागल्या आहेत. हे देखील एक लक्षण असू शकतं की तुमच्या जोडीदाराला तुमच्यात इट्रेस्ट नाही.
3- फोनला चिकटून राहणे
नवरा किंवा बायको बराच वेळ फोनवर असेल तर. तसेच आपला फोन एकटं सोडून कुठे जात नसेल, तर काहीतरी गडबड आहे हे समजून घ्या. फोनशी अशी अटॅचमेंट म्हणजे त्यांच्यात भीती असू शकते की तुम्ही फोन तपासू शकता.
4- देहबोली बदलते
जर तुमचा जोडीदार विचित्र किंवा वेगळं वागत असेल तर ते कोणा तिसऱ्या व्यक्तीमुळे होऊ शकते. अशावेळी ऑफिसमध्ये जास्त काम असल्याचा आव लोक आणतात. ते बाहेर जास्त वेळ घालवू लागतात आणि तुमच्यासाठी त्यांना वेळच मिळत नसेल, तर काही गडबड आहे असं समजा.
5- जिव्हाळा नसणे
वैवाहिक नात्यात शारीरिक जवळीक सर्वात महत्त्वाची असते. जर तुमच्या नात्यात तसं होत नसेल, तर सावध राहा. जर तुमच्या जोडीदाराचा स्पर्श आवडत नसेल किंवा तुमच्याबद्दल त्याला काहीही वाटत नसेल, तर ते तुमच्यासाठी एक मोठं लक्षण ठरू शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Relationship, Relationships, Social media, Viral, Wife and husband