मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /दारू प्यायल्यावर हँगओव्हर का होतं? शरिरामध्ये काय होतात बदल!

दारू प्यायल्यावर हँगओव्हर का होतं? शरिरामध्ये काय होतात बदल!

मद्यपान केल्यानंतर काही तासांनी हॅंगओव्हरचा परिणाम जाणवू लागतो आणि तो पुढील 24 तासांपर्यंत दिसून येतो.

मद्यपान केल्यानंतर काही तासांनी हॅंगओव्हरचा परिणाम जाणवू लागतो आणि तो पुढील 24 तासांपर्यंत दिसून येतो.

मद्यपान केल्यानंतर काही तासांनी हॅंगओव्हरचा परिणाम जाणवू लागतो आणि तो पुढील 24 तासांपर्यंत दिसून येतो.

    मुंबई, 30 डिसेंबर : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. या कालावधीत पार्ट्यांचं (Party) आयोजन मोठ्या प्रमाणावर होतं. त्यामुळे साहजिकच अल्कोहोल (Alcohol) अर्थात दारूला मागणी वाढते. मद्यपान करणाऱ्यांमध्ये हॅंगओव्हर (Hangover) हा शब्द नेहमी ऐकायला मिळतो. मद्यपान केल्यानंतर होणारी डोकंदुखी हा याचा सर्वसाधारण अर्थ आहे. हॅंगओव्हर होण्यामागे काही शास्त्रीय कारणंदेखील आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती प्रमाणापेक्षा अधिक मद्यपान करते, तेव्हा त्या व्यक्तीला त्रासदायक अशी काही लक्षणं जाणवू लागतात. त्यालाच शास्त्रीय भाषेत हॅंगओव्हर असं म्हणतात.

    मद्यपान केल्यानंतर काही तासांनी हॅंगओव्हरचा परिणाम जाणवू लागतो आणि तो पुढील 24 तासांपर्यंत दिसून येतो. हॅंगओव्हरचे परिणाम कमी व्हावेत, असं वाटत असेल, तर मद्यप्राशन कमी प्रमाणात करणं आवश्यक असतं. रिकाम्यापोटी मद्यपान केल्यास अल्कोहोल शरीरात वेगानं शोषलं जातं आणि नशा वाढते. तसंच यामुळे हॅंगओव्हरचे परिणामदेखील अधिक तीव्रतेनं दिसून येतात, असं वृत्त 'टीव्ही नाइन हिंदी'ने दिलं आहे.

    'हेल्थ लाइन'च्या अहवालानुसार, शरीरात जाणारे विषारी आणि नुकसानदायी घटक बाहेर टाकण्याचं काम लिव्हर (Liver) करतं. दीर्घ काळ मद्यपान केल्यानं अथवा दारूच्या व्यसनामुळे लिव्हरच्या कार्यक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो. लिव्हरचं काम मंदावतं. असं होऊन देखील मद्यपान न थांबवल्यास लिव्हरला सूज येणं, तसंच अनेक गंभीर आजार होऊ लागतात. लिव्हरचं काम नीट होत नसल्यानं शरीरात विषारी घटक कायम राहतात. वेळेवर उपचार न घेतल्यास लिव्हर बाद (Liver Failure) होतं.

    (प्रेमाच्या मॅटरमध्ये गजाआड गेला, बाहेर आल्यावर 'ती'च्या विरहात घेतला गळफास)

    अल्कोहोल घेतल्यानंतर ते हळूहळू रक्तात मिसळू लागतं. अल्कोहोलच्या प्रभावामुळे शरीरातलं पाणी त्याच्याकडे आकर्षिलं जातं. त्यामुळे मद्यपानानंतर संबंधित व्यक्तीला वारंवार लघवीला अथवा टॉयलेटला जावं लागतं. अशा प्रकारे अल्कोहोल थेट शरीरावर प्रतिकूल परिणाम करू लागतं. शरिरातलं पाणी कमी झाल्यानं अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात. डोकेदुखी, वारंवार तहान लागणं, बेचैन वाटणं असे त्रास जाणवू लागतात. अल्कोहोल घेतल्यानंतर शरीरात मिथेनॉलचं रूपांतर फॉर्माल्डिहाइडमध्ये होतं. हा एक विषारी पदार्थ असून, तो हॅंगओव्हरची लक्षणं वाढवण्यास मदत करतो.

    (जय दुधाणे म्हणतो, 'आविष्कार दारव्हेकर कलिंगड तर स्नेहा वाघ माझ्यासाठी..')

    अल्कोहोल शरीरात गेल्यानंतर पचन संस्थेतल्या अॅसिड्सची (Acids) मात्रा वाढते. त्यामुळे अनेकदा नशेत उलट्या (Vomiting) आणि जुलाब (Diarrhea) होतात. अल्कोहोलमुळे मेंदूशी संबंधित रसायनांचं संतुलन बिघडतं. त्यामुळे संबंधित व्यक्तीला डोकेदुखी आणि बेचैनीसारखे त्रास जाणवू लागतात. मद्यपानानंतर शरीरातल्या पाण्याची पातळी (Water Level) कमी होते. त्यामुळे लिंबूपाणी पिणं आणि पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे. तसंच संबंधित व्यक्तीनं रिकाम्या पोटी राहू नये. या उपायांनी हॅंगओव्हरचे परिणाम कमी होण्यास मदत होते, असं विज्ञान सांगतं.

    First published:

    Tags: Alcohol, Party