मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कमी उंचीच्या मुलींना मिठी मारायला मुलांना का आवडतं? जाणून घ्या कारणे

कमी उंचीच्या मुलींना मिठी मारायला मुलांना का आवडतं? जाणून घ्या कारणे

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

मुलं जेव्हा बुटक्या मुलींना मिठी मारतात, तेव्हा ते तिला सहजपणे उचलू शकतात. त्यांना मिठीत घेऊन मोमेंट क्रिएट करू शकतात. याशिवाय ते आपल्या पार्टनरला प्रेमाने किसही करू शकतात. त्यामुळे त्यांच्या नात्यात प्रेम वाढतं.

मुंबई, 7 जून : आपल्या देशात लग्न जमवताना मुलापेक्षा मुलगी कमी उंचीची हवी, असा अलिखित नियम आहे. काही अपवाद नक्कीच आहेत, परंतु मुलगी ठेंगणीच हवी, असं माननाऱ्यांची संख्या अधिक आहे. शिवाय वरपक्षालाच नाही तर मुलांनाही त्यांच्यापेक्षा कमी उंचीच्या मुली जास्त आवडतात.

अनेक मुलांना आपल्यापेक्षा कमी उंचीच्या मुलीच (Short Height Girls) आवडतात. बुटक्या मुली क्युट (Cute) असतात, ठेंगण्या मुली पार्टनरला जास्त आनंदी ठेवतात शिवाय इमोशनल फीलिंग शेअर करण्यास बुटक्या मुली मदत करतात, अशी बरीच या मागची कारणं असल्याचं म्हटलं जातं. मुलांना अशा मुलींना मिठी मारायला खूप आवडतं. यामागची कारणं काय आहेत? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

Cuddling करायला आवडतं

कोणताही मुलगा जेव्हा आपल्यापेक्षा कमी उंचीच्या मुलीला आपल्या मिठीत घेतो तेव्हा ती त्याच्या मिठीत पूर्णपणे सामावते. यामुळे मुलाला तिला मिठी मारण्याचा आणि Cuddling करण्याचा आनंद मिळतो. यामुळे त्यांच्या रिलेशनशिपमध्ये एक फन मोमेंट पण तयार होते. मुलगी कमी उंचीची असेल तर तिला मिठी मारताना, तिला सहजपणे फिरवता येतं. त्यामुळे त्यांच्यातील अंडरस्टँडिग चांगलं होतं. दुसरीकडे सारख्या उंचीची किंवा जास्त उंच मुलगी असेल तर तिच्यासोबत या गोष्टी करताना तितकी मजा येणार नाही. या संदर्भात mensxp.com ने वृत्त दिलंय.

मुलांना आपण बलवान असल्यासारखं वाटतं

बहुतेक मुलांना मुलींची उंची आपल्यापेक्षा थोडी कमी असावी, असं वाटतं. म्हणूनच मिठी (Hug) मारताना मुलं सहसा त्यांच्यापेक्षा कमी उंची असलेल्या मुलींकडे लक्ष देतात. यामुळे आपण मुलींना आपल्या हाताखाली ठेवू शकतो, असं मुलांना वाटतं. कारण समान किंवा जास्त उंचीच्या मुलीला मिठी मारून ते स्वतःला कमी समजू शकतात. यामुळे त्यांची असुरक्षिततेची (Insecurity) भावना वाढते तसंच आपली प्रतिष्ठा पणाला लागेल, असं त्यांना वाटतं. बुटकी मुलगी असेल तर मुलाला आपण बलवान असल्यासारखं वाटतं अर्थात वर्चस्वाची भावना प्रबळ होते.

भरपूर रोमान्स

कमी उंचीच्या मुलींना कवेत घेणं, मिठी मारणं रोमँटिक रिलेशनशिपसाठी (Romantic Relationship) खूप चांगलं असतं. कारण कमी उंचीच्या मुली उंच मुलींपेक्षा जास्त फ्लेक्झिबल असतात. त्यामुळे मुलं त्यांना समोरून आणि पाठीमागून मिठी मारू शकतात. याशिवाय कमी उंचीच्या मुलींना मिठी मारल्याने त्यांच्यामध्ये प्रेमाचे गोड क्षण निर्माण होतात. दुसरीकडे मुलगी उंच असेल तर या गोष्टीत थोड्या अडचणी येतात.

मुली मुलांवर अवलंबून असल्याची कल्पना

जेव्हा मुलं मुलींना मिठीत घेतात, तेव्हा त्या मिठीत सामावून जातात. त्यांना मुलाच्या मिठीत आपण बाहेरच्या जगापासून पूर्णपणे सुरक्षित आहोत. हा मुलगा आपल्याला कधीच सोडणार नाही, असं वाटतं. तर, मुलगी आपल्यावर अवलंबून आहे, ही कल्पना मुलांना खूप आवडते. त्या आपलं म्हणणं सहज ऐकतील, आपला आदर करतील आणि आपल्या नात्यात कधीही अडचण येणार नाही, असं मुलांना वाटतं.

ठेंगण्या मुली असतात जास्त आकर्षक

कमी उंची असलेल्या मुलींमध्ये मुलांना आकर्षित (Attract) करण्याची क्षमता जास्त असते. शास्त्रज्ञांच्या मते, बुटक्या मुलींच्या शरीरामध्ये इस्ट्रोजेनचं प्रमाण जास्त असतं. तर उंच मुलींमध्ये हे प्रमाण थोडं कमी असतं. यामुळेच मुलांचं लक्ष आधी कमी उंचीच्या मुलींकडे जातं. जर्मनीतील एका रिसर्चनुसार, कमी उंचीच्या मुलींमध्ये फेमिनिझम जास्त असतो. त्या स्वभावाने लाजाळू (Shy) असतात त्यामुळे अशा मुलींशी प्रेमाने बोलणं मुलांना जास्त आवडतं.

अशा मुलींसोबत लव्ह मोमेंट शेअर करणं असतं सोपं

मुलं जेव्हा बुटक्या मुलींना मिठी मारतात, तेव्हा ते तिला सहजपणे उचलू शकतात. त्यांना मिठीत घेऊन मोमेंट क्रिएट करू शकतात. याशिवाय ते आपल्या पार्टनरला प्रेमाने किसही करू शकतात. त्यामुळे त्यांच्या नात्यात प्रेम वाढतं.

इमोशनल बाँड होतो मजबूत

कमी उंचीच्या मुलींना मिठी मारून मुलं त्यांच्या मनातलं मुलींशी सहज बोलू शकतात, व्यक्त होतात. तसंच अशा मुली आपली जास्त काळजी घेऊ शकतात, असंही त्यांना वाटतं. कारण तिला मिठी मारल्यानंतर ती आपल्या वेदना चांगल्या प्रकारे समजू शकते, असं मुलांना वाटतं. दुसरीकडे उंच मुलींना मिठी मारताना, ते शारीरिक आणि मानसिकरित्या कनेक्ट (Emotional Connect) करू शकत नाहीत. मुलं उंच मुलींसमोर सहज व्यक्त होत नाहीत आणि यामुळे त्यांच्या नात्यात मोकळेपणा नसतो.

मिठी मारताना मुलांना आकर्षित करतात ‘या’ गोष्टी

1. बहुतेक मुलांना लहान उंचीच्या मुली आवडतात कारण त्यांना समाजासमोर एक आदर्श जोडपं दिसायला हवं असतं. तसंच कमी उंचीच्या मुलींची जोडी उंच मुलासोबत चांगली दिसते, असा बहुतेकांचा समज असतो.

2. कमी उंचीच्या मुली जास्त चंचल असतात. त्यामुळे त्यांच्यासोबत वेळ घालवणं आणि मिठी मारणं मुलांना आवडतं. आपल्यातलं छोटं मूल पुन्हा जागं झालंय, असं समजून ते मुलीसोबत आनंदाने वेळ घालवतात.

3. लहान मुली उंच मुलींपेक्षा जास्त साहसी असतात, असा एक समज आहे. त्यामुळे पार्टनर कधीच बोर होत नाही, शिवाय आयुष्यात कितीही आव्हानं आली तरी जोडीदाराला मिठी मारून मुलं रिलॅक्स होतात. पार्टनरला मिठी मारल्याने त्यांना आव्हानाचा सामना करण्याची ताकद मिळते, असं म्हणतात.

4. मुलांना बुटक्या मुली क्युट वाटतात. त्यामुळे एखाद्यावेळी ती चिडली तरी मुलगा तिला मिठी मारून सहज पटवून घेतो.

कमी उंचीच्या मुलींना मिठी मारल्याने मुलं भावनिकरित्या जास्त कनेक्ट होतात. कारण मुलीचं डोकं मुलाच्या छातीवर असतं, त्यामुळे मुलीला त्याच्या हृदयाचे ठोके जाणवतात. तसंच उंच मुलाने ठेंगण्या मुलीला मिठीत घेतल्याने त्यांच्यातील प्रेम वाढतं, असंही म्हणतात.

First published:

Tags: Lifestyle, Small girl